जाहिरात

Mia Khalifa: लेबनानमधील हल्ल्यांनंतर मिया खलीफाला अश्रू अनावर; अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

लेबनानवर इस्रायलने केलेल्या भीषण हवाई हल्ल्यांनंतर प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिया खलीफा हिने एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे.

Mia Khalifa: लेबनानमधील हल्ल्यांनंतर मिया खलीफाला अश्रू अनावर; अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

लेबनानमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या भीषण एअरस्ट्राइकचे पडसाद जगभरात उमटत आहेत. मूळची लेबनीज असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मिया खलीफा हिने एक हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओमध्ये मिया अत्यंत भावुक होऊन रडताना दिसत असून, तिने इस्रायल आणि अमेरिकेला 'दहशतवादी' आणि 'फॅसिस्ट' देश म्हटले आहे.

"10 मिनिटांत 160 एअरस्ट्राइक!"

मिया खलीफाने आपल्या व्हिडिओमध्ये लेबनानमधील भयानक वास्तव मांडले आहे. केवळ 10 मिनिटांत 160 हून अधिक हवाई हल्ले करण्यात आले. यामध्ये निवासी इमारती, शाळा, रुग्णालये आणि स्मशानभूमींनाही लक्ष्य करण्यात आले. इस्रायल गेल्या अनेक दशकांपासून हल्ले करत आहे, पण आता आपण आपल्या डोळ्यांनी 'नरसंहार' (Genocide) होताना पाहत आहोत, असे मियाने म्हटले आहे.  अमेरिकेत राहणाऱ्या मियाने खंत व्यक्त केली की, तिच्या कष्टाच्या टॅक्सचा पैसा लेबनानला उद्ध्वस्त करण्यासाठी वापरला जात आहे, हे स्वीकारणे अशक्य आहे.

युद्धाची भीषण आकडेवारी

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच इस्रायलने हे हल्ले केले. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानुसार, या हल्ल्यांत 203 लोकांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी आहेत. इराणसोबतच्या करारात लेबनानचा समावेश नव्हता, त्यामुळे हे हल्ले कायदेशीर असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. अनेक युरोपीय देशांनी इस्रायलच्या या भूमिकेचा निषेध केला असून लेबनानमध्येही युद्धविराम लागू करण्याची मागणी केली आहे.

(नक्की वाचा-  Iran-US War Update: जगाचं टेन्शन वाढलं! इराण-US युद्ध पुन्हा भडकणार? युद्धविरामानंतर 24 तासात काय काय घडलं?)

मियाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, हे हल्ले म्हणजे 'राज्य पुरस्कृत दहशतवाद' आहे. अमेरिका आणि इस्रायल हे दोघेही युद्ध गुन्ह्यांमध्ये (War Crimes) सामील असून, एका दिवशी आंतरराष्ट्रीय न्यायालयात यांचा हिशोब होईल, असा इशारा तिने दिला आहे. मियाचा जन्म बेरूतमध्ये झाला होता, त्यामुळे आपल्या देशाचा हा विनाश पाहून तिला आपले अश्रू रोखता आले नाहीत.

'सीजफायर' केवळ कागदावरच?

एकिकडे शांततेच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे सुरू असलेल्या या बॉम्बफेकीमुळे जागतिक स्तरावर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीजफायरच्या 24 तासांतच परिस्थिती इतकी बिघडेल, अशी अपेक्षा कोणालाही नव्हती.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com