जाहिरात

PM Modi Birthday: डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन, PM मोदींना 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर हा फोन आल्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची आशा वाढली आहे.

PM Modi Birthday: डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन, PM मोदींना 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
PM Modi Birthday
  • अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को उनके 75वें जन्मदिन पर फोन करके बधाई दी है.
  • पीएम मोदी ने लिखा, मेरे 75वें जन्‍मदिन पर फोन कॉल और मुझे बधाई देने के लिए थैंक्‍यू, मेरे दोस्‍त.'
  • ट्रंप ने लिखा, 'मेरे मित्र, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से अच्छी बातचीत हुई. वह बहुत अच्छा काम कर रहे हैं.'
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून याबद्दल माहिती दिली. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाल्यानंतर हा फोन आल्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची आशा वाढली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये ट्रम्प यांचे आभार मानले. "माझ्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, तुमचे आभार. तुमच्यासारखाच मी सुद्धा भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापक आणि जागतिक भागीदारीला नवीन उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे," असे मोदींनी लिहिले. त्यांनी युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण समाधानासाठी ट्रम्प यांच्या पुढाकारालाही समर्थन दिले.

(नक्की वाचा-  PM Modi Birthday: मोदींचा 75 वा वाढदिवस; त्यांच्या प्रवासातील काही दुर्मीळ फोटो जे तुम्ही कधीच पाहिले नसतील)

दोन्ही नेत्यांनी साधला संवाद

डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘ट्रुथ सोशल'वर याबाबत माहिती दिली. "मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी नुकतीच फोनवर खूप चांगली चर्चा झाली. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या! ते खूप चांगले काम करत आहेत. नरेंद्र मोदी यांचे रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद!" असे त्यांनी लिहिले.

Latest and Breaking News on NDTV

या फोन कॉलच्या काही दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका व्यापार प्रतिनिधी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या एका टीमने 16 सप्टेंबर 2025 रोजी भारताला भेट दिली. यावेळी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार करारासह भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर चर्चा झाली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com