'प्रसार भारती नाही तर प्रचार भारती',  दूरदर्शनच्या नव्या लोगोवरुन माजी प्रमुखांची टीका

दूरदर्शनचे माजी प्रमुख आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी देखील या डीडीच्या लोगोच्या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने आपल्या लोगोच्या रंगात बदल केला आहे. चॅनलचा लोगो आकर्षक वाटावा म्हणून हा बदल करण्यात आला आहे. मात्र या बदलामुळे दूरदर्शवर टीका होत आहे. दूरदर्शनच्या इंग्रजी वृत्त वाहिनी डीडी न्यूजने नुकतंच आपल्या नव्या बदलांसह एक प्रमोशनल व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. 

डीडी न्यूजने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की,  'नव्या रुपात, मात्र मुल्ये तीच. आधी कधीही न झालेल्या अशा बातम्यांच्या नव्या प्रवासासाठी सज्ज व्हा. अनुभवा डीडी न्यूजचा नवा अवतार. डीडी न्यूज - भरोसा जीत का.'

(नक्की वाचा- अल्पवयीन बाईकस्वाराची BMW कारला धडक, मुलाच्या आईने संपवलं आयुष्य)

डीडी न्यूजने केलेल्या या बदलानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार होताना दिसत आहे. डीडीने आपल्या लोगोमध्ये वापरलेल्या भगव्या रंगावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. अनेक यूजर्सनी म्हटलं की, चॅनेलचा लोगो भवगा आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा बदल करण्यात आला आहे. दूरदर्शनचे माजी प्रमुख आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी देखील या बदलाबाबत नाराजी व्यक्त केली. 

Advertisement

जवाहर सरकार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'निवडणुकीदरम्यान डीडीचं भगवेकरण झालेलं पाहून दु:ख झालं. नॅशनल ब्रॉडकास्टर दूरदर्शनने आपल्या ऐतिहासिक लोगोला भगवा रंग दिला आहे. या संस्थेचा माजी प्रमुख म्हणून या भगवेकरणाने मी चिंतीत आहे. आचारसंहितेचा हा भंग आहे. आता ही प्रसार भारती नाही तर प्रचार भारती झाली आहे.' 

(नक्की वाचा- जामीनासाठी आरोग्याशी कोण खेळेल? तुरुंगात पुरी-भाजी खाण्याच्या आरोपावर केजरीवाल म्हणाले...)  

दूरदर्शनचे सध्याचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी, 'जवाहर सरकार यांचे आरोप फेटाळले आहेत. लोगोचा रंग बदल हा व्हिज्युअल इफेक्ट एक भाग आहे. आकर्षक रंगाचा वापर चॅनल ब्रँण्डिंगसाठी महत्वाचा आहे. केवळ लोगोच नाहीतर चॅनेलसाठी नवीन लाईटनिंग आणि उपकरणांस लूक आणि फील देखील अपग्रेड करण्यात आला आहे.'

Advertisement
Topics mentioned in this article