हैदराबादमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. अल्पवयीन बाईकस्वाराने BMW कारला धडक दिली. मात्र या घटनेनंतर मुलाच्या आईने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बीएमडब्लू कार चालक दोघांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने कारला धडक दिल्यानंतर कारचं काही प्रमाणात नुकसान झालं होते. कारचा बंपरच्या काही भागाचं नुकसान झालं होतं. याची भरपाई म्हणून कार चालकाने मुलाकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे नाही दिले तर पोलिसात तक्रार करण्याची धमकी देखील कार चालकाने दिली होती.
विद्यार्थ्यांच्या भगव्या ड्रेसवर प्रश्न विचारणं पडलं महाग, जमावाकडून शाळेची तोडफोड
घडलेल्या प्रकाराची माहिती जेव्हा मुलाची आई सूर्या कुमारीला मिळाली त्यावेळी तिला धक्काच बसला. कार चालकाने मागितलेले पैसे कसे आणि कुठून आणायचे याची चिंता तिला सतावत होता. यातूनच तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय.
सूर्या कुमारीच्या आत्महत्येनंतर तिच्या पतीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कार चालक चंद्रशेखर आणि महेश या दोघांना ताब्यात घेतलं.
'तरुण भारत' वृत्तपत्राच्या 2 कर्मचाऱ्यांचा कारच्या धडकेत मृत्यू; CCTV Footage आलं समोर
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चंद्रशेखर आणि महेश यांनी म्हटलं की, सूर्या यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं यात आमची काय चुकी आहे. आम्ही कार चालक आहोत, त्यामुळे घडलेल्या प्रकाराची माहिती मालकांना देणे बंधनकारक होते. त्यामुळेच आम्ही झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी केली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world