जाहिरात

FAIL, END, NO चा काय आहे फुल फॉर्म ? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितला होता अर्थ, तुम्ही पण समजून घ्या

त्यामुळे नकारात्मक दृष्टीकोनातून कोणी विचार करू नये. नेहमी सकारात्मक विचार करावा. त्यातून आपल्यालाच फायदा होतो असं त्याचं मत होतं.

FAIL, END, NO चा काय आहे फुल फॉर्म ? डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितला होता अर्थ, तुम्ही पण समजून घ्या

Full Form of FAIL, END, NO: अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला असं माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं. 'Failure' म्हणजेच अपयश. हा शब्द असा आहे की ज्याची प्रत्येकालाच भीती वाटते. पण जिवनातील ही अशी खरी गोष्ट ही की ज्याचा सामना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी करावाच लागतो. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि तरुणांसाठी या शब्दाची एक विशेष व्याख्या तयार केली होती. त्यांनी सांगितलेला हा विचार जर आपण जीवनात स्विकारला, तर कोणतीही अडचण किंवा संघर्ष तुम्हाला घाबरवू शकणार नाही असा त्यांचा विश्वास होता. 

FAIL चा खरा अर्थ काय?
डॉ. एपीजे अब्दुल कलाम नेहमी सांगायचे की, FAIL म्हणजे 'First Attempt In Learning' अर्थात शिकण्याचा पहिला प्रयत्न. जेव्हा आपण एखाद्या कामात यशस्वी होत नाही. त्यावेळी प्रत्यक्षात आपण काहीतरी नवीन शिकत असतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता. अपयश आपल्याला आपल्या चुका समजून घेण्याची संधी देतो. शिवाय भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याची ताकद ही देतो.डॉ. कलाम यांच्या मते, यशापेक्षा अपयशातून जास्त शिकायला मिळते. जर जीवनात कधी अपयश आलेच नाही, तर माणसाला त्याच्या खऱ्या क्षमतेची ओळख कधीच होणार नाही असं ही ते म्हणत होते. 

नक्की वाचा - Anaya Bangar: अनाया बांगरला कोण आवडतं? पहिल्यांदाच मन मोकळं केलं, सांगितलं, पुरूष की...

END चा अर्थ  काय? 
डॉ. कलाम केवळ 'FAIL' नाही, तर 'END' आणि 'NO' या शब्दांकडेही अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचे. त्याची ही त्यांनी फोड केली होती.  ते म्हणायचे की, END म्हणजे 'Effort Never Dies' म्हणजेच प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. एखाद्या प्रयत्नाला यश लगेच मिळाले नाही, तरी त्यातून मिळालेला अनुभव भविष्यात नक्कीच कामी येतो असा ही त्यांचा विश्वास होता. त्यांची ही मत ठाम आणि थेट होती. त्यामुळे ती प्रेरणादायी ठरतात.  

नक्की वाचा - Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा लहान भाऊ आशीर्वादची चर्चा का? वडीलांनी थेट सांगितलं

NO चा सकारात्मक दृष्टिकोन
याच बरोबर त्यांनी 'NO' या शब्दाला प्रेरणादायी रूप देत दिले होते. त्याचा अर्थ समजून समोरचा ही चकीत होत अहे. NO चा अर्थ 'Next Opportunity' असा त्यांनी लावला होता. म्हणजेच पुढची संधी. त्यामुळे कुठे 'नाही' हे उत्तर मिळाले, तर निराश न होता ती एका नवीन संधीची सुरुवात आहे, असे मानले पाहिजे असं ते सांगत. त्यामुळे नकारात्मक दृष्टीकोनातून कोणी विचार करू नये. नेहमी सकारात्मक विचार करावा. त्यातून आपल्यालाच फायदा होतो असं त्याचं मत होतं. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com