- माजी क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी अनाया बांगरने लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर समाजात वेगळी ओळख तयार केली आहे
- अनायाने स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि जोडीदाराबाबत भाष्य केले
- तिने स्पष्टपणे सांगितले की तिला पुरुष आवडतात आणि सध्या तिला एका योग्य जोडीदाराच्या शोधात आहे
अनाया बांगरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. माजी क्रिकेटपटू संजय बांगरची ही मुलगी तिच्या लिंग बदला मुळे चर्चेत आले. आपण लिंग बदल करत असल्याचं तिने जाहीर पणे सांगितलं होतं. तिचा हा बिंदास्तपण सर्वांनाच आवडला होता, शिवाय तिचं कौतूक ही झालं होतं. पण काहींनी टिका ही केली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुला पासून मुलगी झालेल्या अनायानं पहिल्यांदाच आपल्या मनातली गोष्ट जाहीर पणे सांगितली आहे. तिला कोण आवडतं ते तिने मनमोकळे पणाने सांगितलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर (Sex Reassignment Surgery) तीने आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे. लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर तिला होणार त्रास ते तिचा अनुभव याचे व्हिडीओ ती शेअर करत असते. आता अनायाने नुकतीच एका स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली होती. प्रसिद्ध कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या या शोमध्ये तिला पाहीलं गेलं. यावेळी तिने आपल्या बिंदास्त स्वभावानं सर्वांची मनं जिंकली. शिवाय आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि भविष्यातील जोडीदाराबद्दल पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.
या शोदरम्यान प्रणीतने अनायाला तिला कोण आवडतं असा प्रश्न केला. त्याला तेवढ्याच ताकदीने तिने उत्तर दिले आहे. ती सरळ म्हणाली की "मला पुरुष आवडतात आणि मी स्ट्रेट आहे." ती ऐवढ्यावरच थांबली नाही ती म्हणाली की सध्या माझ्या आयुष्यात कोणीही नाही. मला एका योग्य जोडीदाराचा शोध आहे. त्यावर प्रणीतने तिला पुढचा प्रश्न केला. तो असा होता की तुला कसा मुलगा आवडेल. त्यावर ती म्हणाली की तो उंच असावा. दिसायला स्मार्ट असावा. शिवाय त्याची बॉडी ही चांगली असावी असा अपेक्षा तिने व्यक्त केल्या. सर्वात महत्वाचं म्हणजे माझी काळजी घेणारा आणि तेवढाच भावनिक असावा असं ही ती म्हणाली.
अनाया स्वतः आधी क्रिकेट खेळत होती. प्रणीतने तिला क्रिकेटपटूंबाबत थेट प्रश्न विचारला. तुला क्रिकेटपटू आवडतात का? त्यांचे मेसेज तुला येतात का? या प्रश्नाला थेट उत्तर देणे अनायाने टाळले. ती हसून म्हणाली, "मी आधी क्रिकेट खेळले आहे, अनेक क्रिकेटपटूंना जवळून चांगले ओळखते. या प्रश्नावर तिने अधिक बोलणे टाळले. मात्र नेटकऱ्यांमध्ये मात्र याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी अनायाने सोशल मीडियावर 'आर्यन ते अनाया' या आपल्या कठीण प्रवासाची माहिती दिली होती. या शस्त्रक्रियेनंतर ती आई होऊ शकणार नाही, परंतु भविष्यात मूल हवे असल्यास ती सरोगसीचा (Surrogacy) पर्याय निवडू शकते, असं ही तिने स्पष्ट केलं आहे.
Anaya Bangar on Pranit More's Show:
— Sonu (@Cricket_live247) June 6, 2026
Anaya Bangar said, "I am into men, and my s*xual orientation is straight. I want someone tall and muscular in my life. I even receive messages from cricketers. pic.twitter.com/9FMliYTRgU
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world