न्यायमूर्ती संजीव खन्ना (Justice Sanjeev Khanna) यांनी आज भारताच्या 51 व्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. संजीव खन्ना यांची सीजेआय डीवाय चंद्रचूड यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला निवृत्त झाले. नवे CJI संजीव खन्ना यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल. ते 13 मे 2025 पर्यंत CJI च्या पदावर असतील.
नक्की वाचा - सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांसंदर्भात महत्त्वाचा आदेश, आदेशामुळे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
12 ऑक्टोबरला केंद्र सरकारने CJI चंद्रचूड यांना एक पत्र पाठवलं होतं. त्यावेळी त्यांना आपला उत्तराधिकारी निवडण्याची विनंती करण्यात आली होती. यावेळी चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला दिलेल्या उत्तरात न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचं नाव सूचवलं होतं. यावर राष्ट्रपतींकडून शिक्कामोर्तब झाल्यानंतर न्यायमूर्ती खन्ना यांची निवड निश्चित करण्यात आली.
कोण आहेत न्यायमूर्ती खन्ना?
- कलम 370 च्या निर्णयात सहभाग
- इलेक्टॉरल बॉन्ड रद्द करणाऱ्या खंडपीठात
- PMLA प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन
- न्यायमूर्ती एचआर खन्नाचे पुतणे. खन्ना यांनी ADM
- जबलपूरच्या निर्णयात असहमती दाखवली होती आणि नाराज सरकारने त्यांची CJI पदावर नियुक्ती केली नव्हती. त्यानंतर खन्ना यांनी राजीनामा दिला होता.
- 2019 मध्ये न्यायमूर्ती संजीव खन्ना यांना सर्वोच्च न्यायालयात
- CJI खन्ना हे शांत, गंभीर आणि सरळ स्वभावाचे आहेत. ते पब्लिसिटीपासून लांब असतात.
- ते 25 मे 2025 ला निवृत्त होतील.
नक्की वाचा - Code of Conduct : आचारसंहितेचं उल्लंघन होतंय? एका क्लिकवर तक्रार करा, जाणून घ्या सोपी पद्धत!
कोण आहे न्यायमूर्ती संजीव खन्ना?
न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 ला झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. 1983 मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी झाली. येथूनच त्यांच्या कायद्याच्या प्रवासाला सुरुवात जाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना सुरुवातीला दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात वकिली करीत होते. यानंतर त्यांना दिल्लीच्या उच्च न्यायालयात प्रमोट करण्यात आलं.
14 वर्षांपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केलं काम...
न्यायमूर्ती खन्ना 14 वर्षांपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. 2005 मध्ये अॅडिशनल न्यायाधीश आणि 2006 मध्ये स्थायी न्यायाधीश बनले. न्यायमूर्ती संजीव खन्ना 18 जानेवारी 2019 रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून प्रमोट करण्यात आले. त्यांनी 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2023 पर्यंत सर्वोच्च न्यायालय लिगल सर्विस कमिटीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सध्या ते राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य देखील आहेत.
कोणत्या महत्त्वाच्या निर्णयात सहभाग?
न्यायमूर्ती संजीव खन्ना हे बिलकिस बानो प्रकरणात निर्णय सुनावणाऱ्या खंडपीठात सामील होते. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता. त्यांनी केजरीवालांना एकदा अंतरिम जामीन दिला होता आणि नंतर त्यांना नियमित जामीन सुनावला होता. VPAT चं 100 वेरिफिकेशन, इलेक्टोरल बाँड स्कीम, कलम 370 हटवण्यावरुन दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठात न्यायामूर्ती संजीव सामील आहेत.