जाहिरात

Code of Conduct : आचारसंहितेचं उल्लंघन होतंय? एका क्लिकवर तक्रार करा, जाणून घ्या सोपी पद्धत!

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, तक्रारदारास निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने'सी-व्हिजल ॲप' विकसित केलं आहे.

Code of Conduct : आचारसंहितेचं उल्लंघन होतंय? एका क्लिकवर तक्रार करा, जाणून घ्या सोपी पद्धत!
मुंबई:

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल. याकाळात अनेक वेळा आचारसंहितेचे उल्लंघन केले जाते.या गोष्टी मतदार ही पाहात असतात. अशा वेळी या आचारसंहिता भंगाची तक्रार कुठे आणि कोणाकडे करायची असा प्रश्न सर्व सामान्य मतदारांना समोर असतो. त्यावर आता निवडणूक आयोगाने एक नामी शक्कल शोधुन काढली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, तक्रारदारास निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने'सी-व्हिजल ॲप' विकसित केलं आहे. त्यावरून मतदार थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकतात.  

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीच्या तारखा निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी 15 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत  जाहिर केल्या. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणूका होणार आहेत. निवडणुकांची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. यासाठी त्यांनी राजकीय पक्ष, उमेदवारांना काही नियम घालून दिले आहेत. या नियमांनाच आचारसंहिता असे म्हणातात.

धनंजय मुंडेंची संपत्ती 5 वर्षात दुप्पट; महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या संपत्तीत कितीने झाली वाढ?

नक्की वाचा - धनंजय मुंडेंची संपत्ती 5 वर्षात दुप्पट; महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या संपत्तीत कितीने झाली वाढ?

आचारसंहिता कालावधीत काय करावे, काय करू नये, याविषयी उमेदवार, प्रशासन व राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. त्यामुळे निवडणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांसोबत उमेदवारांनाही  आचारसंहितेचे नियम पाळणं बंधनकारक असते. तरीसुद्धा, बऱ्याचदा आचारसंहितेचे उल्लंघन होते. याची तक्रार आता अगदी सहज करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासाठी  'सी-व्हिजल सिटीझन ॲप' विकसित केलं आहे. या  ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने कारवाईही केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, यामध्ये तक्रादारराचे नाव गोपनीय ठेवलं जाते.  

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास तक्रार करण्यासाठी सी-व्हिजल ॲप ओपन करावा. त्यानतंर आचारसंहिता उल्लंघनाचा प्रकार निवडावा. घटनेच्या तपशीलासह, नियमाचे   उल्लंघन झालेली वेळ, स्थान, फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करणं आवश्यक आहे. या ॲपचा वापर करून घरबसल्या काही मिनिटांतच नागरिकांना राजकिय गैरव्यव्हाराच्या घटनांची तक्रार सहज नोंदवता येणार आहे. यामुळे निवडणूक काळात होणारा गैर प्रकार टाळण्यास मदतही होणार आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती फोटो किंवा दोन मिनिटांपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करते, तेव्हा भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे त्याचे लोकेशन मॅपिंगसह ॲपवर फोटो / व्हिडीओ अपलोड करावा लागतो. फोटो, व्हिडिओ अपलोड केल्यावर लोकेशन सहज ट्रॅक करता येते. 

काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

नक्की वाचा - काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी?

एकदा का एखादया तक्रार नोंदवल्यानंतर, जिल्हा कंट्रोल रूममध्ये जिथे फिल्ड युनिटला नेमले जाते, तिथे माहिती बीप होते आणि फील्ड युनिटमध्ये फ्लाइंग स्क्वॉड्स, स्टॅटिक पाळत ठेवणारी टीम, रिझर्व्ह टीम प्रत्येक फिल्ड युनिटमध्ये सीव्हीआयजीआयएल इन्व्हेस्टिगेशन नावाचा एक जीआयएस- आधारित मोबाईल, ॲप्लिकेशन असतो, जो फिल्ड युनिटला जीआयएस संकेत आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे अनुसरण करून थेट त्या ठिकाणी पोहोचू देतो आणि तक्रार नोंदवली जाते.

फिल्ड युनिट तक्रारीवरून कार्यवाही केल्यानंतर त्यांच्यामार्फत निर्णय  लावण्यासाठी फिल्ड रिपोर्ट संबंधित रिटर्निंग आफिसरला संपुर्ण माहिती अॅपद्वारे आनलाईन पाठवली जाते. ही घटना योग्य आढळल्यास पुढील कार्यवाहीसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविली जाते आणि जागरुक नागरिकाला १०० मिनिटांत स्थितीबद्दल माहिती दिली जाते.

Previous Article
दुसऱ्या लग्नासाठी धर्म बदलला, तलाक होताच हिंदू धर्मात परतली अभिनेत्री
Code of Conduct : आचारसंहितेचं उल्लंघन होतंय? एका क्लिकवर तक्रार करा, जाणून घ्या सोपी पद्धत!
Ratan Tata 10 thousand crores wealth what did Shantanu Naidu and his dog tito gets
Next Article
रतन टाटांच्या 10 हजार कोटींच्या संपत्तीतील शंतनू नायडूला काय मिळालं? प्रिय टीटोलाही विसरले नाही!