पांढरे शुभ्र कडक इस्त्री केलेले कपडे, लक्झरी कार, मागं-पुढं कार्यकर्त्यांची गर्दी असा एकंदर आमदाराचा रुबाब असतो. मात्र कायद्यापुढे आमदार कसा असतो, यातं चित्र पाहायचं असेल तर हरियाणातील एक व्हिडीओ तुम्हाला पाहावा लागेल. ज्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमदाराचा अवस्था गल्लीतल्या गुंडासारखी केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार धर्म सिंह छौक्कर यांच्यासोबत हा सगळा प्रकार घडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धर्म सिंह छौक्कर यांना ईडीने 1500 कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. मागील अनेक दिवसांपासून ईडी त्यांचा शोध घेत होती. अखेर एका हॉटेलमध्ये लपलेले असताना ईडीने त्यांना फिल्मी स्टाईलने पकडलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, दिसत आहे की छौक्कर हॉटेलमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ईडीचे अधिकारी त्यांचा पाठलाग करून पकडतात.
(नक्की वाचा- Jalgaon News : इन्स्टाग्रावरचं प्रेम, विवाहबाह्य संबंध अन्... पाचोऱ्यातील 3 मृतदेहांचं गुढ उकललं)
मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार धर्म सिंह छौक्कर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये बसले होते. ईडीला ही माहिती मिळाल्यानंतर अधिकारी तिथे पोहोचले. ईडीच्या अधिकाऱ्यांना पाहून छौक्कर पळून जाऊ लागले. यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठलाग करून पकडले. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या माजी आमदाराला अधिकाऱ्यांना जमिनीवर पाडलं. जमिनीवर पडलेल्या छौक्कर यांनी उठण्यास मज्जाव केला त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कॉलर धरून उठवलं. यात त्यांचा शर्ट देखील फाटला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका माजी आमदाराची अवस्था केविलवाणी केली.)
काय आहे प्रकरण?
माजी काँग्रेस आमदार धर्म सिंह छौक्कर, त्यांची मुले विकास आणि सिकंदर यांच्यावर 1500 हून अधिक घर खरेदीदारांना फसवल्याचा आणि त्यांची 500 कोटी रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विकास फरार आहे, तर सिकंदरला गेल्या वर्षी ईडीने अटक केली होती. सध्या तो जामिनावर आहे. गुरुग्राम पोलिसांनी साई ऐना फार्म्स आणि संबंधित कंपन्यांविरुद्ध घर खरेदीदारांकडून फसवणूक आणि पैसे उकळल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे, ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे.
नक्की वाचा - Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये भररस्त्यात साधुची हत्या, धक्कादायक CCTV समोर
याप्रकरणी गेल्या वर्षी मार्चमध्ये ईडीने धर्म सिंह छौक्क यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु माजी आमदार न्यायालयात हजर राहिले नाहीत. दरम्यान त्यांनी ऑक्टोबरमध्ये हरियाणामध्ये विधानसभा निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते फरार होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांची 44 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली आहे.