रामराजे शिंदे, नवी दिल्ली
Election Commission's press conference: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. मात्र निवडणुका कधी लागणार हे अद्याप स्पष्ट नाही. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती
- एकूण किती महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे ?
महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका असून यासाठी निवडणुका होणार आहेत.
- एकूण किती नगर परिषदांची निवडणूक होणार आहे ?
महाराष्ट्रामध्ये एकूण 247 नगर परिषदांसाठी निवडणूक होणार आहे.
- महाराष्ट्रात एकूण किती नगर पंचायतींसाठी निवडणूक होणार आहे ?
महाराष्ट्रामध्ये एकूण मिळून 147 नगर पंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.
- महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकूण 34 जिल्हा परिषदांचा समावेश असून, या जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होणार आहे.
- किती पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे ?
महाराष्ट्रामध्ये 351 पंचायत समित्यांसाठी निवडणूक होणार आहे.
- किती ग्राम पंचायतींसाठी यंदा निवडणूक होणार आहे ?
यंदा 27782 ग्राम पंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world