Election News: 2 पेक्षा जास्त मुलं असतील तरी आता लढता येणार निवडणूक, 'या' राज्याने नियम बदलला

निवडणूक सुधारणेनुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेले नागरिक आता पंचायत आणि नगरपालिका निवडणूक लढवू शकतील.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • राजस्थानने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या व्यक्तींना लढण्याची अट काढली
  • या निर्णयामुळे आता अनेकांना पंचायत व नगरपालिका निवडणुका लढविण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे
  • मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना काही अटी होत्या. त्यात दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना निवडणूक लढता येत नव्हती. त्यामुळे लोक संपर्क, जनाधार असून ही अनेक जणांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढता येत नव्हत्या. पण आता ही अडचण दुर झाली आहे. दोन मुलांची अटच काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो राज्यात लागू केला जाईल. 

नक्की वाचा - Vigilance Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरी पैशांची 'खाण'!, रोकड अन् सोन्याचा ढीग मोजता मोजता अधिकारी थकले

राजस्थान सरकारने आपल्या निवडणूक नियमांमध्ये ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'राजस्थान पंचायती राज अधिनियम 2026' आणि 'राजस्थान नगरपालिका अधिनियम 2026' ला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, आता दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या व्यक्तींनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी असलेली दोन मुलांची सक्ती आता संपुष्टात आली आहे.

नक्की वाचा - Shocking news: नोकरीचे आमिष, ड्रग्ज अन् धर्मांतर! सख्ख्या बहिणींच्या काळ्या साम्राज्याची हादरवून टाकणारी कहाणी

निवडणूक सुधारणेनुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेले नागरिक आता पंचायत आणि नगरपालिका निवडणूक लढवू शकतील. त्याबाबतचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. या निर्णया सोबतच राज्यातील महसूल गळती रोखण्यासाठी आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 'आर्थिक गुन्हे नियंत्रण संचालनालय' स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे मुख्यालय जयपूरमध्ये असेल. हे संचालनालय बँकिंग फसवणूक, जमिनीवरील अवैध ताबा आणि करचोरी सारख्या प्रकरणांवर लक्ष ठेवेल. यासाठी 107 नवीन पदांची भरती देखील केली जाणार आहे.

नक्की वाचा - Holi News: होळीला बाजारात नकली रंगाची भरभराट! 'अशी' करा खऱ्या- खोट्या रंगाची ओळख