जाहिरात

Iran War Crises:देशात ESMA नाही, 'आवश्यक वस्तू कायदा' लागू; दोघांमध्ये फरक काय? गॅस तुटवड्याशी काय आहे संबंध?

जगातील कित्येक देश अद्याप युद्धाच्या झळा सोसत आहेत. दरम्यान भारतातही एलपीजी आणि इतर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Iran War Crises:देशात ESMA नाही, 'आवश्यक वस्तू कायदा' लागू; दोघांमध्ये फरक काय? गॅस तुटवड्याशी काय आहे संबंध?

Essential Commodities Act in India : जगातील कित्येक देश अद्याप युद्धाच्या झळा सोसत आहेत. दरम्यान भारतातही एलपीजी आणि इतर गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही माध्यमांनुसार, लोकांना गॅस सिलिंडर साठवण्यापासून रोखण्यासाठी आणि एलपीजी पुरवठ्यात अडचण येऊ नये यासाठी केंद्र सरकार ESMA म्हणजेच अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम लागू (ESMA - Essential Services Maintenance Act) केल्याच्या बातम्या दाखविल्या जात होत्या. दरम्यान याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.   

Essential Commodities Act आणि  ESMA कायद्यात फरक काय?

 भारतामध्ये गॅस वितरणासंदर्भात जारी केलेल्या नोटिफिकेशनबाबत सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार ESMA कायदा लागू केलेला नाही, तर Essential Commodities Act (आवश्यक वस्तू कायदा) लागू करण्यात आला आहे. Essential Commodities Act आणि ESMA हे दोन वेगवेगळे कायदे आहेत. ESMA कायद्याअंतर्गत अत्यावश्यक सेवांमध्ये आणि वस्तूंच्या वाहतूक व्यवस्थेवरही निर्बंध लागू होऊ शकतात, तर Essential Commodities Act अंतर्गत अशा प्रकारचे निर्बंध नसतात.

नक्की वाचा - Iran War Crises: सिलेंडरच्या किंमती 3000 रुपयांवर! मुंबईतील हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर

सरकारच्या सूत्रांनुसार सध्या गॅसवर लागू करण्यात आलेल्या Essential Commodities Act चा उद्देश कुकिंग गॅस आणि वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यात सामान्य नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये हा आहे. या कायद्याअंतर्गत घरगुती गॅस आणि वाहनांसाठी लागणाऱ्या गॅसच्या पुरवठ्याला कंपन्यांनी प्राधान्य द्यावं, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने स्पष्ट केलं आहे की ESMA कायदा लागू करण्याचा कोणताही प्रश्न नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com