Sonam Wangchuk Custodial Death Fact Check: प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांच्या मृत्यूचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोनम वांगचूक यांचा कोठडीत मृत्यू झाला असल्याचं लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जाहीर केल्याचं दिसत आहे. मात्र ही संपूर्ण घटना खोटी आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने स्पष्ट केलंय की, हा AI ने तयार केलेला डीपफेक व्हिडिओ आहे आणि जनरल द्विवेदी यांनी अशा प्रकारे कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
हा पाकिस्तानी प्रोपगंडा अकाऊंट्सकडून करण्यात आलं. भारतीय सैन्याविरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा यांचा हेतू असल्याचं म्हटलं जात आहे.
काय आहे सत्य?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पाकिस्तानी हँडल्सने शेअर केलेल्या ३० ते ४० सेकंदाच्या क्लिपमध्ये जनरल उपेंद्र द्विवेदी (Indian Army Chief Gen. Upendra Dwivedi) कथितपणे म्हणतात, सोनम वांगचूक याचा कोठडीत असताना मृत्यू झाला आहे. याचं दु:ख आहे. द्विवेदी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असल्यासारखं वातावरण आहे.
PIB फॅक्ट चेकमध्ये २७ नोव्हेंबर २०२५ च्या पोस्टमध्ये म्हटलं...
- हा व्हिडिओ एआय एडिटेड आहे. लष्करप्रमुखांनी सोनम वांगचूक यांच्या मृत्यूबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सोनम वांगचूक जिवंत आहे आणि जोधपूर सेंट्रल तुरुंगात NSA च्या ताब्यात आहे.
काय आहे हेतू?
भारतीय दलावरील विश्वास कमी करणं आणि चुकीची माहिती पसरवणं
सल्ला - अशा प्रकारचा कंटेन्ट शेअर करू नये. केवळ अधिकृत स्त्रोत (PIB, सरकारी वेबसाइट) यावर विश्वास ठेवा.
विविध मागण्यासाठी संघर्ष...
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची सरकारकडून विविध मागण्या आहेत. या मागण्यांसाठी बराच काळ ते उपोषण करीत होते. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, राज्यघटनेतील सहावे परिशिष्ठ लागू करावे याशिवाय लडाखमध्ये संसदीय जागा वाढवणे, लोकसेवा आयोगाची स्थापना करणे अशा मागण्या आहे.