जाहिरात

Imran Khan: अराजक माजल्यास लक्ष विचलित करण्यासाठी भारतावर महाभयानक हल्ल्याचा ISI चा कट

IANSच्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीर किंवा पंजाब सीमेऐवजी बांगलादेशमधील मॉड्यूलवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.

Imran Khan: अराजक माजल्यास लक्ष विचलित करण्यासाठी भारतावर महाभयानक हल्ल्याचा ISI चा कट
नवी दिल्ली:

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कथित मृत्यूच्या अफवांमुळे पाकिस्तानमधील राजकीय वातावरण सध्या अत्यंत तापलेले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय गुप्तचर संस्थांनी देशातील सुरक्षा दलांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानमधील संभाव्य अराजकता आणि गृहयुद्धासारखी परिस्थिती पाहता, तेथील गुप्तचर यंत्रणा आयएसआय (ISI) पाकिस्तानातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासा, तिथल्या नागरिकांचा रोष कमी व्हावा यासाठी भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा: इम्रान खान जिवंत आहेत की नाही? पाकिस्तानात मोठा गोंधळ, बहिणींचा गंभीर आरोप

इम्रान समर्थक आक्रमक

माजी क्रिकेटपटू आणि लोकप्रिय नेते इम्रान खान यांना रावळपिंडीतील अडियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इम्रान खान यांना तुरुंगात मारहाण करण्यात आल्याने त्यांचा म-त्यू झाल्याची अफवा पसरली आहे. इम्रान खान यांच्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने पाकिस्तानातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे म्हणजेच PTI चे हजारो समर्थक तुरुंगाबाहेर जमा झाले आहेत. आम्हाला इम्रान खान यांना पाहू द्या आम्हाला त्यांना भेटायचे आहे अशी मागणी करत हे कार्यकर्ते अडून बसलेत. पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांच्या मृत्यूबाबतच्या सगळ्या गोष्टी अफवा असल्याचं म्हणत समर्थकांनी केलेली मागणी फेटाळून लावली आहे. भारताच्या गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, जर खान यांच्याबद्दलची ठोस आणि अधिकृत माहिती मिळाली नाही तर पीटीआय पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक होतील आणि त्यानंतर पाकिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर जाऊन अराजक माजेल अशी भीती वर्तवण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार भडकण्याची शक्यता असल्याचाही इशारा देण्यात आला आहे. 

लक्ष विचलित करण्याचा ISIS चा प्रयत्न

IANS ने दिलेल्या बातमीमध्ये गुप्तचर अधिकाऱ्याच्या हवाला देण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या सुरक्षेवर होणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानात अराजक माजले तर तिथल्या नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि देशात एक उन्माद तयार करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दहशतवाद्यांच्या मदतीने भारतामध्ये घातपाती कारवाया घडवून आणू शकते. आयएसआयने भारतात '26/11 मुंबई' किंवा 'पुलवामा' हल्ल्याच्या धर्तीवर मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. भारतामध्ये महाभयानक हल्ला घडविला जाऊ शकतो अशी भीती आहे. 

नक्की वाचा: जन्मदातीच बनली 'जल्लाद'! 15 वर्षांच्या मुलाला ISIS दहशतवादी बनवण्याचा आईचा प्रयत्न

चिथावणीसाठी पुन्हा हाफिज सईदचा वापर करणार 

IANSच्या वृत्तानुसार जम्मू-काश्मीर किंवा पंजाब सीमेऐवजी बांगलादेशमधील मॉड्यूलवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. बांगलादेशात आयएसआयशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) आणि हरकत-उल-जिहादी-इस्लामी (HuJI) चे गट सक्रिय आहेत.  भारतावर हल्ल्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांना चिथावणी मिळावी यासाठी हाफिज सईदला बांगलादेशात पाठवण्याची योजना आयएसआय आखत असल्याचीही माहिती मिळते आहे. घातपाती कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी भारताच्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com