2 लाखांंत बनला IPS अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला; पुढे काय घडलं, पाहा VIDEO

Fake IPS : मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या पदांमध्ये IPS चा समावेश आहे. मात्र एक बहाद्दर 2 लाख रुपये देऊन कोणतीही परीक्षा न देता आयपीएस अधिकारी बनला. त्यानंतर IPS ची वर्दी घालून थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. 

मिथिलेश कुमार असं या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मात्र मिथिलेशने कुणाचीही फसवणूक केली नसल्याने पोलिसांना त्याला समज देऊन सोडून दिलं. बिहारमधील जमुई भागात ही घटना घडली आहे. मिथिलेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याला पोलीस बनण्याची आधीपासून इच्छा होती.

(नक्की वाचा -  IAS आणि IPS अधिकारी; पगार, पॉवर जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक आहे?)

पाहा VIDEO

याच दरम्यान त्याला मनोज सिंह नावाचा व्यक्ती भेटला. या व्यक्तीने मिथिलेश कुमारला आयपीएस अधिकारी बनवण्यास मदत करण्याचं आश्वासन दिलं. आयपीएस बनवण्याच्या नावाखाली मनोज सिंहने त्याच्याकडून 2 लाख रुपये देखील घेतले. त्यानंतर काही दिवसांना मनोज सिंहने मिथिलेशला IPS ची वर्दी, बंदूक असं सर्व दिलं. तसेच त्यांची एका पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी देखील लावली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यानंतर मिथिलेशही मोठ्या रुबाबात पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि मी आयपीएस असल्याचं सांगू लागला. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कुमारला पाहिल्यावर त्याची गंमत करायला सुरुवात केली. "या सर, तुमचं सिकंदरा पोलीस स्टेशनमध्ये स्वागत आहे." 

पोलीस स्टेशनमधील या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होते आहे. 20 सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट केल्यापासून ते 1.1  मिलियनहून अधिक वेळा हा पाहिले गेला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहे. 

(नक्की वाचा -  Job Interview Tips : मुलाखतीदरम्यान या चुका टाळल्यास तुमची नोकरी पक्की समजा! )

आता बनणार डॉक्टर

मिथिलेशला आता डॉक्टर बनायचं आहे. त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो डॉक्टर बनण्याची इच्छा व्यक्त करत आहे. डॉक्टर बनून आता समाजाची सेवा करेन आणि लोकांचे भले करणार आहे, असं मिथिलेशने सांगितलं.