जाहिरात

Farmer Protest : शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखलं, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या, 4 जखमी

शंभू बॉर्डवर शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कींचा प्रकार घडला. यादरम्यान चार शेतकरी जखमी झाले आहेत.

Farmer Protest : शेतकऱ्यांना शंभू बॉर्डरवर रोखलं, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या, 4 जखमी
नवी दिल्ली:

MSP आणि विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा सीमेवर 101 शेतकऱ्यांची पथकं सरकारवर दबाव आणण्यासाठी शंभू बॉर्डवरून दिल्लीच्या दिशेने निघाली आहेत. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांकडून शंभू सीमेवर शेतकऱ्यांना अडवण्यात आलं. यावेळी मोठा गदारोळ झाला. पंजाब-हरियाणा सीमेवर पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादात काही शेतकरी जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेसाठी शंभू बॉर्डरवर बॅरिकेट्स लावले आहेत आणि खिळेही ठोकले आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रू धुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. शेतकऱ्यांकडून सरकारच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. 

शेतकरी आंदोलकांनी मोर्चा दिल्लीकडे वळवला; बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या

नक्की वाचा - शेतकरी आंदोलकांनी मोर्चा दिल्लीकडे वळवला; बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या

शंभू बॉर्डवर शेतकरी संघटना आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कींचा प्रकार घडला. यादरम्यान चार शेतकरी जखमी झाले आहेत. याशिवाय अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्यामुळे एक शेतकरी जखमी झाले आहेत. मात्र तरीही शेतकरी शंभू बॉर्डरवरुन जाण्यास तयार नाहीत. 

पंजाब-हरियाणा सीमेवर मागील 9 महिन्यांपासून आंदोलनासाठी बसलेले शेतकरी आता दिल्लीकडे निघाले आहेत. सर्व शेतकरी संघटनांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. शेतकरी पायी चालत निघाले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यातील बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या आहेत. 

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

  • शेतकऱ्यांच्या सर्व शेत मालाला हमीभाव देणारा कायदा करावा.
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
  • शेतकरी आणि शेतमंजूरांची कर्जमाफी करावी.
  • भूमीअधिग्रहन कायदा 2013 पुन्हा एकदा लागू करण्यात यावा.
  • लखीमपूर खिरी इथल्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी.
  • मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा.
  • वीज विधेयक 2000 रद्द करण्यात यावे.
  • मसाल्याच्या पदार्थासाठी राष्ट्रीय आयोगाचं गठन केलं जावं.
  • संविधानाची पाचवी सूची लागू करून आदिवासींच्या जमीनीची लूट थांबवण्यात यावी.
  • खोटे बियाणं, कीटकनाशक, खतं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com