जाहिरात

शेतकरी आंदोलकांनी मोर्चा दिल्लीकडे वळवला; बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या

Farmers Protest : हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलानं बॅरिकेड्स लावल्याने शेतकऱ्यांना रोखण्यात यश मिळाले आहे. एमएसपी, कर्जमाफी आणि पेन्शन यासारख्या 13 मागण्यांसाठी फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे.

शेतकरी आंदोलकांनी मोर्चा दिल्लीकडे वळवला; बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

पंजाब-हरियाणा सीमेवर मागील 9 महिन्यांपासून आंदोलनासाठी बसलेले शेतकरी आता दिल्लीकडे निघाले आहेत. सर्व शेतकरी संघटनांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. शेतकरी पायी चालत अंबालाकडे निघाले. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यातील बॅरिकेड्स आणि काटेरी तारा उखडून टाकल्या आहेत. 

(नक्की वाचा-  अर्ध्या तासात 350 किमी अंतर कापणार; देशातील पहिला हायपरलूप ट्रॅक काय आहे?)

यानंतर हरियाणा पोलिसांनी आंदोलकांना इशारा दिला. तरीही शेतकरी थांबले नाहीत. दरम्यान शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आल्यामुळे तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचा वापर केला. शेतकऱ्यांचा विरोध पाहता हरियाणाच्या गृहसचिव सुमिता मिश्रा यांनी पंजाब-हरियाणा सीमेला लागून असलेल्या अंबालामधील 11 गावांमध्ये इंटरनेट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

हरियाणा पोलीस आणि निमलष्करी दलानं बॅरिकेड्स लावल्याने शेतकऱ्यांना रोखण्यात यश मिळाले आहे. एमएसपी, कर्जमाफी आणि पेन्शन यासारख्या 13 मागण्यांसाठी फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना या मोर्चाला हरियाणा सरकारनं परवानगी दिलेली नाही.

farmer Protest

(नक्की वाचा- काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल, राज्यसभेत मोठा गदारोळ; भाजप आक्रमक)

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

  • शेतकऱ्यांच्या सर्व शेत मालाला हमीभाव देणारा कायदा करावा.
  • स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा.
  • शेतकरी आणि शेतमंजूरांची कर्जमाफी करावी.
  • भूमीअधिग्रहन कायदा 2013 पुन्हा एकदा लागू करण्यात यावा.
  • लखीमपूर खिरी इथल्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाना मदत आणि सरकारी नोकरी देण्यात यावी.
  • मुक्त व्यापार करार रद्द करण्यात यावा.
  • वीज विधेयक 2000 रद्द करण्यात यावे.
  • मसाल्याच्या पदार्थासाठी राष्ट्रीय आयोगाचं गठन केलं जावं.
  • संविधानाची पाचवी सूची लागू करून आदिवासींच्या जमीनीची लूट थांबवण्यात यावी.
  • खोटे बियाणं, कीटकनाशक, खतं तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कायदा करण्यात यावा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: