जाहिरात

अर्ध्या तासात 350 किमी अंतर कापणार; देशातील पहिला हायपरलूप ट्रॅक काय आहे?

व्हर्जिन हायपरलूपची चाचणी 9 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे 500 मीटरच्या ट्रॅकवर पॉडसह घेण्यात आली. त्याचा वेग ताशी 161 किलोमीटर होता. जगातील अनेक देशांमध्ये हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

अर्ध्या तासात 350 किमी अंतर कापणार; देशातील पहिला हायपरलूप ट्रॅक काय आहे?

भारतात वाहतुकीच्या साधनांमध्ये भविष्यात मोठे बदल होणार आहे. वाहतुकीची अत्याधुनिक साधने भविष्यात भारतात दिसतील. याची सुरुवात देखील सुरु झाली आहे. हायपरलप ट्रॅकची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. हायपरलूप ट्रॅकसंबंधीत ट्वीट रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ भारतातील पहिल्या हायपरलूप टेस्टिंग ट्रॅकचा आहे. हायस्पीड वाहतुकीच्या दृष्टीने भारतासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकते. 410 मीटर लांबीचा हायपरलूप टेस्ट ट्रॅक आयआयटी मद्रासच्या कॅम्पसमध्ये तयार करण्यात आला आहे. 

हायपरलूप टेस्ट ट्रॅक हा भारतीय रेल्वे, IIT मद्रासच्या हायपरलूप टीम आणि IIT मद्रासचा स्टार्टअप TuTr Hyperloop यांचा संयुक्त प्रकल्प आहे. हायपरलूप टेस्ट ट्रॅकचा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिले की, 'भारताचा पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक'. 

हायपरलूप टेस्ट ट्रॅक थियुर येथील IIT मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये आहे, ज्याची लांबी 410 मीटर आहे. या टेस्ट ट्रॅकवर ट्रेन 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. आता हायपरलूपची चाचणी ताशी 600 किलोमीटर वेगाने लांब ट्रॅकवर केली जाईल.  

Latest and Breaking News on NDTV

काय आहे हायपरलूप ट्रॅक तंत्रज्ञान?

हायपरलूप ही हाय-स्पीड ट्रेन आहे जी ट्यूबमधील व्हॅक्यूममध्ये धावते. हे तंत्रज्ञान इल़ॉन मस्क यांनी मांडलं आहे. हायपरलूप ट्रेनचा कमाल वेग ताशी 1000 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. हेच कारण आहे की जर सर्व काही सुरळीत झाले आणि भारतात हायपरलूप गाड्या सुरू झाल्या तर देशातील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचं चित्रच बदलून जाईल. मात्र हे तंत्रज्ञान अद्याप नवीन आहे आणि त्यात बऱ्याच गोष्टींचा शोध लावणे गरजेचं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

व्हर्जिन हायपरलूपची चाचणी 9 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे 500 मीटरच्या ट्रॅकवर पॉडसह घेण्यात आली. त्याचा वेग ताशी 161 किलोमीटर होता. जगातील अनेक देशांमध्ये हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. 2050 सालापर्यंत युरोपभोवती एकूण 10000 किमी लांबीचे हायपरलूप नेटवर्क विकसित केले जाईल, असा दावा केला जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

इलॉन मस्क यांची आयडिया

टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी सर्वात आधी ही आयडिया जगासमोर आणली होती. मस्क यांना 2013 मध्ये ही आयडिया सर्वांसमोर ठेवली होती. सॅन फ्रॅन्सिस्को आणि लॉस एंजलिसमध्ये त्यांनी चाचणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. जमिनीवर हवाई वाहतुकीपेक्षा वेगाने होणाऱ्या वाहतुकीवर काम केलं पाहिजे, असं मस्क यांचं मत होतं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com