Fastag Rules 2026: नवीन वर्ष सुरु झाले असून सरकारकडून अनेक नियम बदलले जात आहेत. वाहनांवरील फास्टॅगबाबतही असाच मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केवायव्ही (नो युअर व्हेईकल) प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2026 पासून रद्द केली जात आहे.
फास्टॅगच्या नियमात मोठा बदल..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 1 फेब्रुवारी 2026 पासून नवीन कार फास्टॅगसाठी वेगळी KYV प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे आणि आता सर्व पडताळणी फास्टॅग जारी करण्यापूर्वीच VAHAN डेटाबेसद्वारे केली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी होईल; सध्याच्या फास्टॅगसाठी नवीन KYV ची गरज नाही, फक्त तक्रार आल्यास किंवा गैरवापर झाल्यासच तपासणी होईल, आणि कमर्शिअल वाहनांसाठी नियम वेगळे आहेत.
एनएचएआयने स्पष्ट केले आहे की १ फेब्रुवारी नंतर जारी केलेल्या नवीन फास्टॅगसाठी आता दीर्घ केवायव्ही प्रक्रियेची आवश्यकता राहणार नाही. टोल प्लाझावरील त्रासांपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नवीन नियम काय आहेत?
- ज्या कार मालकांकडे आधीच सक्रिय फास्टॅग आहे त्यांना आता त्यांचे केवायव्ही अपडेट करण्याची आवश्यकता नाही.
- आता, केवायव्ही किंवा कागदपत्रे फक्त अशा प्रकरणांमध्ये आवश्यक असतील जिथे गैरवापर, चुकीचे जारी करणे किंवा बनावट फास्टॅगच्या तक्रारी असतील.
- "एक वाहन, एक फास्टॅग" नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, ज्यामुळे एकाच टॅगचा वापर अनेक वाहनांमध्ये होऊ नये.
Bullet Train : बुलेट ट्रेनचा प्रवास आता स्वप्न नाही! 'या' दिवशी खरेदी करा पहिले तिकीट; वाचा सर्व माहिती
दरम्यान, अनेकदा असे दिसून आले आहे की केवायसी अपडेट न केल्यामुळे वापरकर्त्यांचे फास्टॅग ब्लॅकलिस्ट केले जातात किंवा निष्क्रिय केले जातात, ज्यामुळे टोल प्लाझावर लांब रांगा लागतात. हा नियम रद्द केल्याने वाहन मालकांचा वेळ तर वाचेलच पण टोलची प्रक्रियाही सुरळीत सुरु राहील. त्यामुळेच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world