महिला डॉक्टर्सना नाईट शिफ्टबद्दल काय वाटतं? धक्कादायक सर्वेक्षण आले समोर

इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हणजेच आय.एम.ए. ने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून भयंकर वास्तव समोर आले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

कोलकात्यात महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी ती महिला डॉक्टर नाईट शिफ्टला होता. देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हणजेच आय.एम.ए. ने एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून भयंकर वास्तव समोर आले आहे. यात महिला डॉक्टर्सनी आपले अनुभव आणि मतं मांडली आहेत. हे सर्वेक्षणाचा अहवाल आता समोर आला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 24 तासात तब्बल 3 हजार 885 महिला डॉक्टर्सनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. या सर्वेक्षणात 22 राज्यातील महिला डॉक्टर्सनी सहभाग नोंदवला. केरळ राज्याच्या संशोधन विभागाने या सर्वेक्षणाचे आयोजन केले होते. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जवळपास 35 टक्के महिला डॉक्टर्सनी आपल्याला नाईट शिफ्टची भिती वाटते. रात्रीच्या शिफ्टमध्ये असुरक्षित असल्याचे जाणवते असे मत नोंदवले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

काही महिला डॉक्टर्स यांनी आपल्याला अनेक गोष्टींचा समना करावा लागतो असे सांगितले आहे. नकोशा स्पर्शाचा अनेक वेळा सामना करावा लागतो. तर एक महिला डॉक्टर तर मी माझ्या बरोबर चाकू ठेवते असेही मत नोंदवले आहे. तीने या सर्वेक्षणात आपले मत नोंदवताना, माझी ड्युटी अशा ठिकाणी आहे जिथे अंधार आणि निर्जन रस्ता आहे. त्यामुळे बॅगेत नेहमी चाकू ठेवावा लागतो. शिवाय मिरचीपूड स्प्रे ही बरोबर असतो असंही तिने या सर्वेक्षणात सांगितलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...

हॉस्पिटलमध्ये आपात्कालीन विभाग असतो. या विभाता मोठ्या प्रमाणात गर्दी आणि धावपळ असते. याचा अनेक जण गैर फायदा घेतात असे निरिक्षणही एका महिला डॉक्टरने नोंदवले आहे. त्यावेळी नको त्या स्पर्धाचा सामना करावा लागतो असं तिने सांगितले. या सर्वेक्षणात जवळपास 35 टक्के महिलांनी नाईट शिफ्टची भिती वाटते असे मत नोंदवले आहे. शिवाय नाईट शिफ्ट जरी असेल तरी 45 टक्के महिला डॉक्टर्सना सुरक्षित ड्युटी रूम मिळत नाही अशी माहितीही या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'आमचे पैसे घेऊन काँग्रेसचे काम केलं, आम्हाला युती धर्म शिकवता का?' भाजप राष्ट्रवादी वाद चव्हाट्यावर

या सर्वावर काही उपाय योजनाही महिला डॉक्टर्सनी सुचवल्या आहेत. त्यात प्रामुख्याने सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. शिवाय सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे असणेही आवश्यक आहे. केंद्रीय सुरक्षा कायद लागू करण्याची मागणीही होत आहे. रूग्णांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात नातेवाईक येत असतात. त्यांच्यावर कुठेतरी मर्यादा घालण्याची मागणी होत आहे. अलार्म सिस्टम असणेही तितकेच गरजेचे आहे. अशी मते ही या सर्वेक्षणात नोंदवली गेली आहेत. 

Advertisement