माजी मुख्यमंत्र्यांनी फडकावलं बंडाचं निशाण, भाजपामध्ये करणार प्रवेश?

Champai Soren News : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन पक्षाच्या नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत

Advertisement
Read Time: 2 mins
C
मुंबई:

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन  (Champai Soren) यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाच्या (JMM) नेतृत्त्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व पर्याय खुले असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. सोरेन भाजपामध्ये जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले सोरेन?

चंपई सोरेन यांनी एक मोठी पोस्ट लिहीत झारखंड मुक्ती मोर्चाच्या हायकमांडवर हल्ला चढवलाय. गेल्या चार दशकांच्या निष्कलंक राजकीय प्रवासात मी पहिल्यांदा आतमधून इतका खचलो आहे. दोन दिवस शांत बसून आत्ममंथन करतो. सर्व घटनाक्रमावर स्वत:ची चूक काय झाली हे शोधत होतो. मला सत्तेचा थोडासाही लोभ कधीच नव्हता. पण, आत्मसन्मानाला झालेली जखमी कशी दाखवणार? त्यासाठी मी माझं शल्य मांडत आहे,' असं सोरेन यांनी म्हंटलं आहे. 

( नक्की वाचा : मुलगा जय विधानसभा निवडणूक लढवणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर )
 

माझा अपमान झाला - सोरेन

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम अन्य व्यक्ती रद्द करतो यापेक्षा लोकशाहीत अधिक अपमानास्पद काय आहे? असं सोरेन यांनी पोस्टमध्ये लिहलं आहे. अपमानाचा कडू घोट पिऊन मी सांगितलं की नियुक्ती पत्राचे वितरण सकाळी आहे. तर विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी आहे. त्या परिस्थितीमध्ये मी कसा सहभागी होईल? पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. 

'अनेक वर्षांपासून पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक होत नाहीय. एकतर्फी आदेश दिले जात आहेत. मी कुणाला माझा त्रास सांगणार? या पक्षात माझी गणना वरिष्ठ नेत्यांमध्ये होते. बाकीचे सर्व ज्युनिअर आहेत. माझ्यापेक्षा सिनिअर सुु्प्रिमो तब्येतीमुळे राजकारणात सक्रीय नाहीत. तर माझ्याकडं काय पर्याय होता. ते सक्रीय असते तर कदाचित परिस्थिती वेगळी असती.'

Advertisement

गेल्या 3 दिवसांपासून होत असलेल्या अपमानजनक व्यवहारांमुळे मी भावुक झालो होतो. पण, त्यांना फक्त खुर्चीमध्ये रस होता. माझं पक्षात काही महत्त्व नाही, अस्तित्व नाही असं मला वाटत आहे. ज्या पक्षासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं आहे. या काळात अनेक अपमानजनक घटना घडल्या आहेत. त्याचा उल्लेख मला सध्या करण्याची इच्छा नाही. इतका अपमान आणि तिरस्कारानंतर मला पर्यायी मार्ग शोधणे भाग आहे.'
 

Topics mentioned in this article