Jagdeep Dhankar: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची तब्येत बिघडली, बाथरूममध्ये दोनदा पडले बेशुद्ध

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजीच प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वीही ते कच्छचे रण (गुजरात), उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली येथे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते बेशुद्ध झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • पूर्व उपराष्ट्रपति जगदीप धनखड़ को 10 जनवरी को बेहोश होने के बाद एम्स में भर्ती कराया गया है
  • 74 वर्षीय धनखड़ को बाथरूम में दो बार बेहोश होने के बाद तड़के अस्पताल ले जाया गया था
  • एम्स में उनका एमआरआई जांच की गई और अन्य जांचें मंगलवार को की जाएंगी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स (AIIMS) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 10 जानेवारी रोजी ते त्यांच्या राहत्या घरी बाथरूममध्ये दोनदा बेशुद्ध होऊन पडले होते. 74 वर्षीय धनखड यांच्यावर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

वैद्यकीय तपासणी आणि उपचार

धनखड यांना मंगळवारी एम्समध्ये नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना पुढील तपासासाठी रुग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी त्यांची एमआरआय (MRI) चाचणी केली असून इतर काही महत्त्वाच्या चाचण्या आज (मंगळवार) केल्या जाणार आहेत. 74 वर्षीय धनखड यांना गेल्या वर्षीही हृदयविकारामुळे एम्समध्ये दाखल करावे लागले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारीक लक्ष ठेवून आहेत.

(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)

प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला होता राजीनामा

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजीच प्रकृतीच्या कारणास्तव उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. यापूर्वीही ते कच्छचे रण (गुजरात), उत्तराखंड, केरळ आणि दिल्ली येथे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ते बेशुद्ध झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमांदरम्यान त्यांना चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचा त्रास झाला होता. सातत्याने जाणवणाऱ्या या त्रासामुळेच त्यांनी सक्रिय राजकारणातून काहीसा ब्रेक घेतला आहे.

एम्समधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनखड यांना किमान रात्रभर रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले जाईल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, सर्व चाचण्यांचे अहवाल आल्यानंतरच पुढील उपचारांची दिशा ठरवली जाईल. त्यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे.

Advertisement

Topics mentioned in this article