जाहिरात

Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी

Holiday on 15 January : राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु ते त्यांच्या निवडणूक क्षेत्राबाहेर काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत दिली जाणार आहे.

Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी

Holiday on 15 January : महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयांसह बँका आणि खासगी आस्थापनांनाही लागू असेल जेणेकरून प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता येईल.

सामान्य प्रशासन विभागाने 6 जानेवारी, 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना (Gazette) प्रसिद्ध केली. ही सुट्टी परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (Negotiable Instruments Act, 1881) च्या कलम 25 अंतर्गत जाहीर करण्यात आली असून, ती बँका आणि सर्व सरकारी व निमसरकारी कार्यालयांना लागू राहील.

(नक्की वाचा-  Akola News: अकोला हादरले! काँग्रेसच्या बड्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या)

कोणाकोणाला मिळणार सुट्टीचा लाभ?

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ही सुट्टी केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नाही. ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आहे, परंतु ते त्यांच्या निवडणूक क्षेत्राबाहेर काम करत आहेत, अशा कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत दिली जाणार आहे.

खासगी आस्थापना, कारखाने आणि आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नाही, अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत देणे आवश्यक असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

(नक्की वाचा-  Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याने चर्चांना उधाण)

29 महानगरपालिकांची यादी (विभागनिहाय)

  1. मुंबई महानगरपालिका
  2. ठाणे महानगरपालिका
  3. नवी मुंबईमहानगरपालिका
  4. उल्हासनगर महानगरपालिका
  5. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
  6. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
  7. मिरा-भाईंदर महानगरपालिका
  8. वसई-विरार महानगरपालिका
  9. पनवेल महानगरपालिका
  10. नाशिक महानगरपालिका
  11. मालेगाव महानगरपालिका
  12. अहिल्यानगर (अहमदनगर) महानगरपालिका
  13. जळगाव महानगरपालिका
  14. धुळे महानगरपालिका
  15. पुणे महानगरपालिका
  16. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
  17. सोलापूर महानगरपालिका
  18. कोल्हापूर महानगरपालिका
  19. इचलकरंजी महानगरपालिका
  20. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
  21. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
  22. नांदेड-वाघाळा महानगरपालिका
  23. परभणी महानगरपालिका
  24. जालना महानगरपालिका
  25. लातूर महानगरपालिका
  26. अमरावती महानगरपालिका
  27. अकोला महानगरपालिका
  28. नागपूर महानगरपालिका
  29. चंद्रपूर महानगरपालिका

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com