Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल आणखी 14 रुपयांनी महागणार? सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची शक्यता

Fuel Price Hike : अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्रोल आणखी 14 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना येत्या काही दिवसांत इंधनाचा आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोल 4 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी महागल्यानंतर, आता पुन्हा एकदा मोठी दरवाढ होण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोलच्या किमती आणखी 14 रुपयांनी वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

14 रुपयांच्या दरवाढीचे गणित काय?

आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक पातळीवर खनिज तेल, गॅस आणि एलपीजी (LPG) च्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना अत्यंत महागड्या दराने कच्चा माल खरेदी करावा लागत आहे. 15 मे रोजी सरकारने पेट्रोल 4 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी महाग केले होते. या दरवाढीपूर्वी तेल कंपन्यांना रोज 1000 कोटींचा तोटा होत होता, जो आता 750 कोटींवर आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)

1 लाख कोटींच्या तोट्याची भीती

चालू तिमाहीमध्ये सरकारी तेल कंपन्यांचा एकूण तोटा तब्बल 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पेट्रोलियम कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रतिलीटर 14 रुपये तोटा होत आहे. हा तोटा पूर्णपणे भरून काढण्यासाठी प्रतिलीटर किमतीत 14 रुपयांची वाढ करणे हाच एकमेव पर्याय कंपन्यांसमोर आहे.

सध्याचे मुंबईतील इंधन दर 

पेट्रोल: 103 रुपयांवरून  107 रुपये प्रतिलीटर
डिझेल: 90 रुपयांवरून 93 रुपये प्रतिलीटर

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

जागतिक पातळीवर इंधनाचा भडका

  • मलेशिया – 56 टक्के
  • पाकिस्तान – 55 टक्के
  • युएई - – 52 टक्के
  • अमेरिका – 45 टक्के
  • कॅनडा – 32 टक्के
  • चीन – 22 टक्के
  • इंग्लंड - 19 टक्के
     
Topics mentioned in this article