जाहिरात

LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर

New LPG Cylinder Booking Rules: देशातील एलपीजी तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकारने सिलेंडर्सच्या बुकिंगसाठी 'लॉकिंग पिरियड' निश्चित केला आहे. यासोबतच काळाबाजार रोखण्यासाठी आता सिलेंडरच्या डिलिव्हरीसाठी ओटीपी देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर

LPG Cylinder: मिडिल ईस्टमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे 'होर्मुज स्ट्रेट' (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग विस्कळीत झाला होता. याचा थेट फटका भारताच्या इंधन पुरवठ्याला बसला असून देशात LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅसचा संकट देखील दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. म्हणूनच सिलेंडर्सची साठेबाजी आणि काळाबाजार रोखता यावा, यासाठी केंद्र सरकारने अत्यंत कडक नियम लागू केले आहेत. या अंतर्गत केंद्र सरकारने गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 'लॉकिंग पिरियड' निश्चित केला असून ग्राहकांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. 

दोन श्रेणींमध्ये 'लॉकिंग पिरियड' निश्चित

देशातील गॅसची मागणी आणि पुरवठा यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सरकारने ग्राहकांना शहरी भाग आणि ग्रामीण-दुर्गम भाग अशा दोन श्रेणींमध्ये विभागले आहे.  जर तुम्ही शहरात राहत असाल, तर एका सिलेंडरच्या बुकिंगनंतर 25 दिवसांनंतरच तुम्हाला दुसरा सिलेंडर बुक करता येईल. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांसाठी हा कालावधी 45 दिवसांचा असेल. म्हणजेच 45 दिवसांनंतरच नवीन सिलेंडर बुक करता येईल.

(नक्की वाचा-  Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)

उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांनाही नियम लागू

गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहकांनी अवघ्या 15 दिवसांतच दुसरा सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, 25 आणि 45 दिवसांचा हा नियम सर्व घरगुती एलपीजी कनेक्शनवर लागू असेल, ज्यामध्ये 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजना' (PMUY) च्या कनेक्शनचाही समावेश आहे.

सिलेंडर 25 किंवा 45 दिवसांच्या आत संपल्यास काय करावे?

जर तुमच्याकडे एकच सिलेंडर असेल आणि तो मुदतीपूर्वीच संपला, तर घाबरून न जाता खालील 3 पर्यायांचा वापर करता येईल.

  • डबल सिलेंडर कनेक्शन : तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन दुसऱ्या सिलेंडरसाठी अर्ज करू शकता. यामुळे एक सिलेंडर संपल्यावर दुसरा वापरता येईल.
  • 'छोटू' सिलेंडर: बाजारात 5 किलो वजनाचा 'छोटू सिलेंडर' उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या गॅस एजन्सी किंवा निवडक पेट्रोल पंपावर फक्त ओळखपत्र दाखवून हा सिलेंडर खरेदी करता येईल.
  • कमर्शियल सिलेंडर: ग्राहक तात्पुरता कमर्शियल गॅस सिलेंडर वापरू शकतात, कारण लॉकिंग पिरियडचा हा नियम केवळ घरगुती गॅस कनेक्शनसाठी आहे, कमर्शियलसाठी नाही.

(नक्की वाचा-  Nashik News: विवाहितेचा 8 वेळा गर्भपात; कारण ऐकून सारेच हादरले; नाशिकमधील मन सुन्न करणारी घटना!)

डिलिव्हरीसाठी 'ओटीपी' (OTP) देणे अनिवार्य

नवीन नियमांनुसार, आता गॅस एजन्सीचा डिलिव्हरी बॉय तुम्हाला ओटीपी (OTP) दिल्याशिवाय सिलेंडर देणार नाही. सरकारने 'डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड' सिस्टीम सुरू केली आहे. तुम्ही सिलेंडर बुक करताच बिलासोबत हा कोड जारी केला जाईल, जो डिलिव्हरी घेताना डिलिव्हरी बॉयला सांगणे बंधनकारक असेल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com