चिनी कंपनीने बनविलेला रोबोट डॉग आपला आहे असं सांगत तो प्रदर्शनात मांडल्याने निर्माण झालेल्या वादामुळे गलगोटिया विद्यापीठाला AI परिषदेतून (AI Summit) बाहेर काढण्यात आल्याचे कळते आहे. दिल्लीमध्ये एआय समिट सुरू असून यामध्ये जगभरातील AI तज्ज्ञ, या क्षेत्राबद्दल उत्सुकता असलेल्या व्यक्ती एकवटल्या आहेत. AI च्या भव्य प्रदर्शतान गलगोटिया विद्यापीठाने हे चिनी रोबोट डॉग्स स्वतःचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणावर मोठा वाद निर्माण झाला होता. चिनी कंपनीनेही या विद्यापीठाची जाहीरपणे लाज काढली होती. यामुळे विद्यापीठाला या समिटमधून जाण्यास सांगण्यात आल्याचे कळते आहे. यावादासंदर्भात बोलताना विद्यापीठातील प्राध्यापिका नेहा यांनी दावा केला आहे की, त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला होता, गलगोटिया विद्यापीठाला एआय एक्सपोमधून काढलेलं नाही असा दावाही त्यांनी केलाय.
Idiot Galgotias University staff & officials vacate their stall at #IndiaAIImpactSummit2026 following row over display of Chinese-made robodog. Govt had ordered Galgotias to vacate stall at expo.
— BhikuMhatre (@MumbaichaDon) February 18, 2026
.@AshwiniVaishnaw must now seriously look deep into useless bureaucrats around him… pic.twitter.com/nNw8o0Iq0F
शायनिंग मारण्याच्या नादात लाज गेली ?
सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यापीठाला एआय एक्सपोमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. ग्रेटर नोएडा येथील या विद्यापीठाच्या प्रतिनिधीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये तिने दावा केला होता की हा रोबोट डॉग त्यांच्या विद्यापीठाने बनवला आहे. सोशल मीडिया आणि काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, विद्यापीठाने AI समिटमध्ये चिनी कंपनीने बनविलेल्या 'Unitree Go2' या रोबोटिक डॉगला या विद्यापीठाने आपला असल्याचे दाखवत त्याचे नामकरण 'Orion' असे केले आहे. हा रोबोट कुत्रा चीनच्या 'Unitree' या रोबोटिक कंपनीच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही कंपनी भारतात या रोबोट डॉगची ऑनलाइन विक्री करत असून त्याची किंमत 2 ते 3 लाखांच्या दरम्यान आहे. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यापीठाची प्रतिनिधीने दावा केला होता की, गलगोटिया विद्यापीठाच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने (Center of Excellence) 'Orion' विकसित केला आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये विद्यापीठाचे प्राध्यापकानेही हाच दावा केला होता. हा रोबोट विद्यापीठातच तयार करण्यात आला असल्याचाही दावा करण्यात होता.
#WATCH | Noida, UP: On Galgotias University asked to vacate India AI Impact Summit expo, Nitin Kumar Gaur, Galgotias University Registrar says, "This is a jumble of two words, develop, and development. We didn't develop it. We worked on its development... We want to bring them,… pic.twitter.com/tkuQhxNUUc
— ANI (@ANI) February 18, 2026
गलगोटिया विद्यापीठातर्फे सारवासारव करण्याचा प्रयत्न
चिनी रोबोट डॉग वादावर गलगोटिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका नेहा यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये कम्युनिकेशनच्या प्राध्यापिका आहेत. "आम्ही कोणाचीही दिशाभूल केलेली नाही. आपल्या विधानाचा चुकीच्या अर्थ लावला गेला आणि विपर्यास केलेली विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाली. आपण आपले म्हणणे नीटपणे मांडू शकले नसल्याचाही दावा नेहा यांनी केला आहे. वेळेचा अभावामुळे आणि आजूबाजूच्या गोंधळामुळे असे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जी गोष्ट आम्ही बनवलीच नाही ती आमची आहे असा दावा आम्ही कधीच केला नाही असेही नेहा यांचे म्हणणे आहे. नेहा यांनी म्हटलंय की विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विद्यार्थी एकत्रितपणे काही गोष्टींवर काम करतत असतात. हा रोबोट कुत्रा, मुलांच्या प्रोजेक्शनसाठी (सादरीकरणासाठी) आणला होता.
#WATCH | Delhi | On Galgotias University asked to vacate India AI Impact Summit expo, Galgotias University Professor Dr Aishwarya Shrivastava says, "As of now, we have no such information." pic.twitter.com/esR2eaf1yR
— ANI (@ANI) February 18, 2026
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world