अदाणी समुहाचे चेअरमन गौतम अदाणी आज महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार गौतम अदाणी त्रिवेणी संगम येथे पूजा करणार आहेत. त्यानंतर बडा हनुमानगडीवर जाऊन दर्शन घेणार आहेत. गौतम अदानी आपल्या दौऱ्यात इस्कॉन पंडालमध्ये आयोजित भंडारा सेवेतही सहभागी होणार आहेत. महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना अन्नदान करण्यासाठी अदानी समूहाचा हा उपक्रम आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. अदाणी समूहाकडून महाकुंभ मेळ्याच्या संपूर्ण काळामध्ये महाप्रसाद सेवा दिली जाणार आहे, ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे.
अदाणी समूह इस्कॉन आणि गीता प्रेस यांच्या सहकार्याने महाकुंभात भाविकांची अखंड सेवा करत आहे. महाकुंभमेळा परिसरात दररोज एक लाख भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. याशिवाय आरती संग्रहाच्या जवळपास 1 कोटी प्रती कुंभमेळ्यात आलेल्या भाविकांना मोफत दिल्या जाणार आहेत.