एक वेळी ज्या शहराच्या उपमहापौर म्हणून काम केलेल्या व्यक्तीला त्याच शहराच्या फुटपाथवर भाजी विकण्याची वेळ येत असेल तर? असा प्रश्न जर कोणी केला तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. अशी घटना बिहारमधील गया या शहरात घडली आहे. गया शहराच्या उपमहापौरांवर रस्त्यावर भाजी विकण्याची वेळ आली आहे. त्या मागचे कारण जर तुम्ही ऐकाल तर हैराण व्हाला. विशेष म्हणजे या उपमहापौर पहिल्या सफाई कामगार म्हणून काम करत होत्या हे विशेष.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिहारमध्ये गया महापालाकिला आहे. या महापालिकेच्या चिंता देवी या उपमहापौर होत्या. त्यांना लोकांनी निवडून दिलं होतं. पण याच चिंता देवी सध्या शहरातल्या केदारनाथ मार्केट बाहेर भाजी विकताना दिसत आहेत. त्यांना भाजी विकताना पाहून शहरातील लोक हैराण झाले आहेत. ते विचार करत आहेत की चिंता देवींवर अशी वेळ का आली. ऐवढ्या मोठ्या पदावर असतानाही त्या रस्त्या शेजारी भाजी का विकत आहेत? काही नागरिकांनी त्यांच्याकडून भाजी ही विकत घेतली. शिवाय त्यांनी विचारपूस करत तूम्ही रस्त्या शेजारी भाजी का विकत आहाता अशी विचारणाही केली.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंना नेमकं हवंय तरी काय? जवळच्या नेत्याने बोलता बोलता सांगून टाकलं
चिंता देवींनीही आपली समस्या काय आहे हे सांगितले आहे. चिंता देवी सांगतात की त्यांच्या घरातील खर्च भागत नाही. उपमहापौर होवून काही फायदा नाही. एक तर पदाची खुर्ची सांभाळा, पण त्यातून काही ही मिळत नाही. जर काही मिळत नसेल तर घर कसं चालणार? त्या पदापासून आपल्याला काहीही उत्पन्न नाही. पण घर तर चालवायचं आहे. अशा वेळी भाजी विकल्या शिवाय आपल्या समोर कोणताही पर्याय नाही असं त्या सांगतात. त्यातच महापालिकेत होणाऱ्या बैठकांबाबत आपल्याला कोणतीही माहिती दिली जात नाही असं ही त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? अंजली दमानिया यांच्या ट्वीटने चर्चांना उधाण
गेल्या वेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत चिंता देवी यांनी उपमहापौरपदासाठी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी ही झाल्या होत्या. त्यानंतर त्या महापालिकेच्या उपमहापौर ही झाल्या. त्या आधी त्या गया महापालिकेतच एक सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. ज्या वेळी त्या उपमहापौर झाल्या त्यावेळी त्यांचे सर्वांनीच कौतूक केले. त्यांचे सर्वांनीच अभिनंदनही केले. उपमहापौर झाल्यानंतर जिवनात काही तरी बदल होईल असं त्यांना वाटत होतं.
ट्रेंडिंग बातमी - Live Updates : एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल
उपमहापौर झाल्यानंतर चिंता देवी यांनी आपल्या जिवनाची चिंता मिटेल असं वाटलं होतं. ज्या महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होतो त्याच महापालिकेत त्या आता मोठ्या अधिकारपदावर बसल्या होत्या. आता त्यांनी आपल्या जिवनात काही तरी नक्की बदल होईल असं वाटलं होतं. आपली आर्थिक स्थिती सुधारेल असा त्यांना विश्वास होता. मात्र झालं सर्व उलटं. त्यातून काहीच फायदा झाला नाही. उलट केवळ खुर्ची सांभाळण्याचं काम करावं लागलं. त्यातून घरचा खर्चही भागत नव्हता. शेवटी त्यांनी रस्त्या शेजारी भाजी विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्व जण आवाक झाले आहेत.