जाहिरात
16 hours ago

गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांची बैठक संपली असून गिरीश महाजन यांनी भेटीबाबत पत्रकारांशी बातचीत केली. एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नव्हती. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भेटीसाठी आल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं. महायुतीत सर्व आलबेल असून आमच्यात मतमतांतर नसल्याचं गिरीश महाजन यावेळी म्हणाले. 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा दिमाखदार कार्यक्रम होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह आणि देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार असल्याचं महाजन म्हणाले. 

Live Update : आता माझ्या लग्नाचे बघा ! परळी मतदारसंघातील युवकाचा राजेसाहेब देशमुखांना फोन

आता माझ्या लग्नाचे बघा ! परळी मतदारसंघातील युवकाचा राजेसाहेब देशमुखांना फोन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी विधानसभा मतदारसंघाचे पराजित उमेदवार राजेसाहेब देशमुख यांची एक ऑडिओ क्लिप सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजेसाहेब देशमुख यांनी प्रचारादरम्यान मला निवडून दिले तर मी मतदार संघातल्या मुलांचे लग्न लावून देतो असे वक्तव्य केले होते. आता एका युवकाने देशमुख यांना फोन लावत आपली विवाहाची समस्या मांडली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये युवक आम्ही तुम्हाला मतदान केले आहे आता आमच्या लग्नाचे बघा अशी विनंती करताना दिसून येते. या युवकाशी संवाद साधताना देशमुख यांनी देखील त्याला दिलदारपणे उत्तर दिल्याचे दिसून आले आहे. 

Live Update : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट

राज्यातील सत्ता स्थापनेमध्ये सहभागी करून घेण्याबाबतची मागणी या भेटीदरम्यान करण्यात आली. 

विधानसभा निवडणुकीत कुठलाही महत्त्वाचा वाटा किंवा जागा मिळाल्या नाही मात्र आता मंत्रिमंडळात स्थान मिळाव अशी आठवलेंना अपेक्षा.

उमरखेड केज या मतदारसंघासाठी आठवले आग्रही होते

Live Update : देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी रवाना...

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी रवाना...

Live Update : धनंजय मुंडे यांच्यासाठी रेणुका मातेला घातलं साकडं!

धनंजय मुंडे यांच्यासाठी रेणुकेला घातले साकडे.!

परळी विधानसभा मतदार संघातून 1 लाख 40 हजारच्या मताधिक्याने निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना 5 डिसेंबर रोजी स्थापित होणाऱ्या महायुती सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण खाते मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी  माहुरगढ़ येथील रेणुका मातेला साकडे घातले आहे. देवीची महापूजा व महाआरती केली 

Live Update : मुंबई - बडोदा एक्सप्रेसवेचे काम बाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले

मुंबई - बडोदा एक्सप्रेसवेचे काम बाधित शेतकऱ्यांनी बंद पाडले

कडेकोट बंदोबस्तात महामार्गाचे काम सुरू असताना  स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी काम बंद पाडले 

 तलासरी तालुक्यातील कोचाइ बोरमाळ येथे बाधित आदिवासी आंदोलनाच्या पवित्र्यात

मोबदला न देताच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्याचा आरोप

एकूण ६५ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा

४०० ते ५०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौज फाटा घटनास्थळी दाखल

Live Update : द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण, सचिन तेंडुलकरसह राज ठाकरेंची उपस्थिती

द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचं अनावरण

Live Update : लातुरात अनोखा सीताफळ महोत्सव, लाल चॉकलेटी सीताफळाची लातुरकरांना भुरळ

लातूर शहरातील क्रीडा संकुल येथील मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनोख्या सीताफळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी सीताफळच्या नव्या व्हरायटीसह सहभाग नोंदवला असून या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय... फळबाग शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलंय... तर दुष्काळी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाल्यास आर्थिक क्रांती होईल असे सामान्य लोकांना वाटतंय . 

Live Update : 5 डिसेंबर रोजी होणार शपथविधी सोहळा आझाद मैदानएवेजी राजभवनात घ्या; भीम आर्मीची मागणी

5 डिसेंबर रोजी होणार शपथविधी सोहळा आझाद मैदानएवेजी राजभवनात घ्या; भीम आर्मीची मागणी

6 डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी येथे लाखो अनुयायांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पवित्र ठिकाणी आणि महत्त्वाच्या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी आझाद मैदान येथे होणार शपथ विधीचा सोहळा हा राजभवनात घ्यावा अशी मागणी भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे...

Live Update : ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी, उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाला धमकीचा मेल

ताजमहाल बॉम्बने उडवण्याची धमकी 

उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाला धमकीचा मेल 

ताजमहल परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली 

अधिकची कुमक मागवण्यात आली

पोलीस आणि सीआयएसएफ कडून ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली 

बॉम्ब प्रतिरोधक साहित्यासह सुरक्षा दल ताजमहाल परिसरात तैनात 

धमकीचा मेल कुणी पाठवला याबाबतचा शोध सुरू

Live Update : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भीषण अपघात

चार गाड्यांमध्ये अपघात

कंटेनर, ट्रेलर, बस, कारमध्ये अपघात

परशुराम घाटातील वाहतूक ठप्प

बसमधील दहा जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती

Live Update : उपचार घेऊन एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयातून निघाले...

उपचार घेऊन एकनाथ शिंदे ज्युपिटरमधून निघाले...

Live Update : उदय सामंत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दाखल

उदय सामंत सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत

Live Update : जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी आयुक्तांनी भेटण्यासाठी दिला नकार

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका प्रशासक आयुक्त अजय वैद्य यांना गेल्या महिन्यात प्रहार अपंग क्रांती संस्थाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनात विशेष मागण्या होत्या. या संदर्भात आज जागतिक अपंग दिन असल्यामुळे आयुक्त भेटणार असून मागण्यांवर चर्चा होणार होते. त्यास मनपा आयुक्त अजय वैद्य न भेटल्याने संतप्त दिव्यांगांनी शिवाजी चौक ते महामार्ग पालिका मुख्यालय समोर एक दिवशी धरणा आंदोलन केले.

Live Update : सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज

सोयाबीनबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशात गेल्या वर्षीपेक्षा 6 टक्क्यांनी यंदा सोयाबीनचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. पण याचवेळी पुरवठा मात्र कमी राहणार आहे.  आकड्यांचा विचार केल्यास यंदा देशात जवळपास 138 लाख टन सोयाबीनचा पुरवठा असेल. गेल्यावर्षी 149 लाख टनांचा पुरवठा होता. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 11 लाख टन कमी पुरवठा असेल. यंदा उत्पादनाचा अंदाज जवळपास 126 लाख टन आहे. तर गेल्यावर्षी 119 लाख टन उत्पादन होते. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढवून देखील, पुरवठा मात्र कमी राहणार आहे.

Live Update : निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका, उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा

उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना सूचना

मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे

ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा

निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका

पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा

हिंदुत्ववादी भूमिका आपली आजही आहे आणि उद्याही राहणार विरोधक आपल्या हिंदुत्वाची चुकीची लोकांमध्ये मांडणी लोकांमध्ये करत आहेत

उद्धव ठाकरे यांच्या माजी नगरसेवकांना सूचना...

एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल

एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल

ताप आणि अशक्तपणा जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती

विधानसभेच्या धक्क्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी?

विधानसभेच्या धक्क्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी?

विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली. 

मुंबईतील सर्व 36 विधानसभा मतदारसंघातील 227 प्रभागात तयारीला सुरुवात.

ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांसह नेते, सचिव आणि संघटकांची केली नियुक्ती.

विनायक राऊत, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, वरून सरदेसाई, सुनील राऊत, बाळा नर, सुनील शिंदे, अमोल कीर्तिकर यांसह एकूण 18 जणांची टीम प्रत्येकी दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा घेणार आढावा.

पुढी आठवड्याभरात अहवाल तयार करून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवणार. 

अहवालाच्या आधारावर महापालिकेच्या जागांची वर्गवारी करून पुढचा निवडणुकीचा पुढचा आराखडा बनवणार.

राज्यातील शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता?

राज्यातील शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता? जास्त संख्येने मंत्री शपथ घेण्याची तुर्तास शक्यता कमी. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार यामुळे प्रोटोकॉलनुसार जास्त वेळ मिळेल का या विषयी शंका. तसेच नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर मोठा विस्तार होण्याची शक्यता.  शपथविधीत जास्त मंत्री शपथ घ्यावे यासाठी दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडून तुर्तास हिरवा कंदील नसल्याची माहिती.

आझाद मैदानावर पाहाणी करण्यासाठी महायुतीचे नेते थोड्याच वेळात निघणार

आझाद मैदानावर पाहाणी करण्यासाठी महायुतीचे नेते थोड्याच वेळात निघणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट दाखल

सोबतच, भाजप नेते गिरीश महाजन आणि प्रवीण दरेकर ही पोहोचलेत

भाजप पक्ष श्रेष्ठींची राजकीय नियोजित कोणतीच भेट अजित पवार यांची नाही, कार्यालयाची माहिती

अजित पवार यांचा दिल्ली दौरा अनऔपचारिक राजकीय भेटीगाठी. लोकसभा हिवाळी अधिवेशन दरम्यान देशपातळीवर सर्व पक्षीय नेते गाठीभेटीनिमित्त अजित पवार कालपासून दिल्लीत. भाजप पक्ष श्रेष्ठींची राजकीय नियोजित कोणतीच भेट अजित पवार यांची नाही, अजित पवार कार्यालय माहिती. खासगी वैयक्तिक काही कामासाठीच अजित पवार दिल्लीत, सूत्रांची माहिती. 

मिरा-भाईंदरमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, दोन नायजेरियन आरोपींना अटक

मिरा भाईंदर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मीरा रोडच्या नया नगर परिसरातील पूनम गार्डन परिसरात दोन नायजेरियन व्यक्तींना 160 ग्रॅम कोकेन या अमली पदार्थासह अटक केली आहे. या जप्त केलेल्या कोकेन ची आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी 20 लाख रुपये इतकी किंमत आहे. माइक ओकाच्या (45) आणि जेकेबू सॅम्युएल (40) अशी या आरोपींची नावं आहेत त्यांच्या विरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान रद्द, आमदार उत्तम जानकर यांनी केली घोषणा

मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान रद्द, आमदार उत्तम जानकर यांनी केली घोषणा. 

जमाबंदीच्या आदेश असल्याने आणि प्रशासनाचा दबाव असल्याने आम्ही वेगळ्या मार्गाने न्याय मिळवू.

शालेय मुलांचे आणि इतर कोणाचाही नुकसान होऊ नये गावाची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मतदान प्रक्रिया रद्द करण्याचा घेतला निर्णय. 

येत्या पंधरा दिवसात ईव्हीएम बाबतचे सर्व पुरावे उत्तम जानकर महाराष्ट्रला देणार.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज भाजपा पक्षश्रेष्ठी फोनवरून चर्चा करण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज भाजपा पक्षश्रेष्ठी फोनवरून चर्चा करण्याची शक्यता.

शिंदे यांच्या गृह मंत्रालय, विधानसभा अध्यक्षपद यासह काही महत्वाचे खाते यावरून तोडगा काढला जाणार 

शिंदे डीसीएम पद घ्यावे तसेच सत्तेत सहभाग व्हावे यासाठी आग्रही असल्याची माहिती - सूत्र 

शिंदेची आज राज्यातील भाजपा काही नेते भेट पुन्हा घेण्याची शक्यता

पुणे बाजारात शेवग्याला ५०० ते ६०० रुपये विक्रमी दर

पुणे बाजारात शेवग्याला विक्रमी दर. किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलो भाव मिळत आहे. दक्षिणेकडील राज्यात झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला फटका बसला. बाजारात आवक कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार ५०० ते ६०० रुपये किलो भाव मिळत आहे.

फेंगल चक्रीवादळानं आतापर्यंत 16 जण मृत्यूमुखी

फेंगल चक्रीवादळानं आतापर्यंत 16 जण मृत्यूमुखी

कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत पावसाची शक्यता

कोकणालाही वादळामुळे पावसाचा इशारा

तामिळनाडूत वाहने वाहून गेली, दरड कोसळल्या

फेंगल चक्रीवादळानं आतापर्यंत 16 जण मृत्यूमुखी

फेंगल चक्रीवादळानं आतापर्यंत 16 जण मृत्यूमुखी

कर्नाटक, केरळ, तामिळनाडूत पावसाची शक्यता

कोकणालाही वादळामुळे पावसाचा इशारा

तामिळनाडूत वाहने वाहून गेली, दरड कोसळल्या

रब्बी हंगामात 18 हजार 560 शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याकरिता शासनाकडून पीक विमा योजन राबविण्यात येत आहे. त्या योजनेत रब्बी हंगामात वर्धा जिल्ह्यात आजवर १८ हजार ४६० शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे. यातून शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे कवच मिळण्यास मदत झाली आहे. वातावरणातील बदल पाहता आणि रब्बी हंगामातील वाढती पिकांची लागवड बघता विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com