विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 10 दिवस उलटून गेले आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत असताना देखील सरकार स्थापनेला उशीर होत असल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपद आणि जागावाटपावरुन नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचंही बोललं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान एकनाथ शिंदे सरकारला बाहेरुन पाठिंबा देतील अशी देखील चर्चा सुरु होती. यातच आता एकनाथ शिंदे विरोधी पक्षात असतील अशी चर्चा सुरु आहे. अंजली दमानिया यांच्या एका ट्वीटमुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, "शिंदे विरोधी पक्षात? विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच कट का. सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष/विरोधी पक्ष अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजपची स्क्रिप्ट."
शिंदे विरोधी पक्षात ?
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 2, 2024
विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट
सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच.
बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेतातच अस्तित्वात ठेवायचे नाहीत.
गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरं न वाटणे ही भाजप ची script
Eknath Shinde as Leader of…
(नक्की वाचा- विधानसभा निवडणुकीनंतर आज मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान; काय आहे कारण?)
अंजली दमानिया यांच्या ट्वीटनंतर महायुती सरकार स्थापनेला उशीर का होतोय? याला नवीन कारण मिळालं आहे. मात्र अंजली दमानिया यांच्या दाव्यात किती तथ्य आहे हे येत्या दोन दिवसात स्पष्ट होईल.
( नक्की वाचा : महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न )
5 डिसेंबरला शपथविधी
मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित होण्यापूर्वी शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे.5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची 4 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये विधीमंडळाचा गटनेता निवडला जाईल. त्यावेळी महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल हे देखील स्पष्ट होईल. देवेंद्र फडणवीसच भावी मुख्यमंत्री असतील, अशी देखील चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world