- भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रावरून संसदेत वाद निर्माण झाला आहे
- विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, पण प्रकाशन अद्याप झालेले नाही
- पेंग्विन प्रकाशनाने स्पष्ट केले की, Four Stars of Destiny हे पुस्तक अद्याप बाजारात उपलब्ध नाही
Naravane Book Row: भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या 'Four Stars of Destiny' या आत्मचरित्रावरून सध्या देशाच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. संसदेच्या बजेट अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अद्याप प्रकाशित झाले नसल्याचे सांगत संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी पक्षाने त्यांना रोखले. अनेक वेळा संसद तहकूह करण्यात आली. राहुल गांधी यांना आपले म्हणणे मांडता आले नाही. ऐवढेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलता आलं नाही. आता या वादावर खुद्द जनरल नरवणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमका वाद काय आहे?
राहुल गांधी यांनी संसदेत हे पुस्तक दाखवत दावा केला की, हे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. मात्र, पेंग्विन प्रकाशनाने स्पष्ट केले की, हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. यावर राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केला की, "जर पुस्तक छापले गेले नाही, तर माझ्या हातात काय आहे? एक तर नरवणे खोटे बोलत आहेत किंवा प्रकाशक." या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने दिल्ली पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.
जनरल नरवणे यांचे 6 शब्दांत उत्तर
या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर जनरल नरवणे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पेंग्विन प्रकाशनाचे स्पष्टीकरण री-पोस्ट केले. त्यांनी केवळ 6 शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली: "The current status of the book" (पुस्तकाची सद्यस्थिती ही आहे). त्यांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ असा की, प्रकाशकाने दिलेली माहिती अधिकृत असून पुस्तक अद्याप लाँच झालेले नाही.
पुस्तकाच्या प्रकाशनावरून संभ्रम
माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रावरून संसदेत वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी हे पुस्तक संसदेत सादर करण्याचा प्रयत्न केला, ज्याला नियमांचे उल्लंघन सांगत विरोध करण्यात आला. जनरल नरवणे यांनी 2023 मध्ये पुस्तकाच्या 'प्री-बुकिंग'बद्दल ट्विट केले होते, ज्याचा आधार घेत राहुल गांधींनी हे पुस्तक उपलब्ध असल्याचे म्हटले. मात्र, नरवणे यांनी आता स्पष्ट केले आहे की पुस्तकाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या वादातून मार्ग काढण्यासाठी आता अधिकृत प्रकाशनाच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world