जाहिरात
This Article is From Feb 10, 2026

Dombivali news: बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू

सोहम हा डोंबिवली येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. कळव्यातील मनिषा विद्यालयात त्याचे परीक्षा केंद्र होते.

Dombivali news: बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू
डोंबिवली:

रिझवान शेख 

बारावीची परिक्षा सुरू झाली आहे. आज मंगळवारी बारावीचा पहिला पेपर होता. तो पेपर देण्यासाठी सोहम सचिन कटरे हा विद्यार्थी घरातून निघाला. पण तो पेपर देण्यासाठी परिक्षा केंद्रापर्यंत पोहचलाच नाही. पेपरला जातानाच्या वेळेला ट्रेनला प्रचंड गर्द होती. त्यातूनच सोहम धावत्या ट्रेनमधून खाली पडला, तिथेच त्याचा मृत्यू झाला. डोंबिवलीतून  ही अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम सचिन कटरे या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडली. सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. गर्दीमुळे तोल जाऊन सोहम लोकलमधून खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका गंभीर होता की सोहमचा जागीच मृत्यू झाला.

नक्की वाचा - Pune News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत लवकरच मेगाभरती, 'या' पदांसाठी प्रक्रिया होणार सुरू

सोहम हा डोंबिवली येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. कळव्यातील मनिषा विद्यालयात त्याचे परीक्षा केंद्र होते. त्यामुळे तो आपला पहिला पेपर देण्यासाठी घरातून निघाला होता. डोंबिवली ते कळवा असं मोजकच अंतर त्याला लोकलने कापायचं होतं. पण लोकलमधल्या गर्दी मुळे त्याला ते पुर्ण करता आलं नाही. या दुर्दैवी घटनेमुळे सोहमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नक्की वाचा - Panchayat Samiti Result: पंचायत समितीत कुणाची बाजी? तुमच्या तालुक्यात कोणाची सत्ता? पाहा संपूर्ण निकाल

लोकल ट्रेनमधील गर्दी आणि प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेवर अशा घटना या आधी ही घडल्या आहेत. काही वर्षापूर्वी मध्य रेल्वेवरच धावत्या लोकलमधून काही तरुणी खाली कोसळले होते. त्यात  त्यांचा जागीच मृत्य झाला आहे. लोकलला वाढणारी गर्दी ही एक चिंतेचा विषय ठरली आहे. मुंबईत आता एसी लोकल चालणार असं सांगितलं जात आहे. त्यामुळे दरवाज्यात उभे राहण्याचे प्रकरा बंद होतील. पण त्याची अजूनही प्रतिक्षाच आहे. 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com