Gig Workers Strike : स्विगी, ओला-उबेर, झेप्टो ठप्प! आज ॲप-आधारित सेवा बंद, कारण काय? किती काळ बंद असेल?

देशव्यापी संपात स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, ओला, उबर, रॅपिडोमध्ये काम करणारे कोटी गिग वर्कर्स सामील असतील. 

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Gig Workers Nationwide Strike :  LPG, CNG, दूध आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ झाली आहे. ज्याच्या विरोधात १.२ कोटी गिग वर्कर्सनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. १६ मे, शनिवारी देशभरात गिग वर्कर्सचा संप असेल. गिग-प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनने इंधनाच्या किमतीच्या वाढीविरोधात संप पुकारला आहे. 

स्विगी, अ‍ॅमेझॉनची डिलिव्हरी आज बंद...

GIPSWU युनियनचं म्हणणं आहे की, वाढत्या महागाईच्या विरोधात आम्ही काही काळासाठी ॲप-आधारित सेवा तात्पुरत्या बंद करून निषेध नोंदवणार आहोत. त्यांनी अॅप-आधारित सेवा दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या देशव्यापी संपात स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, ओला, उबर, रॅपिडोमध्ये काम करणारे कोटी गिग वर्कर्स सामील असतील. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास महागणार; पर्यटकांमध्ये संताप, स्थानिकही झाले आक्रमक

गिग वर्कर्सची मागणी काय आहे?

इंधनाच्या किमतीतील वाढीमुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा वाढत आहे. गिग वर्कर्स पूर्णपणे बाइक आणि स्कूटरवर अवलंबून आहे. अशात इंधनाच्या किमती वाढल्यामुळे त्यांच्या दररोजच्या कमाईवर परिणाम होत आहे. युनियनचं म्हणणं आहे की, त्यांच्या प्रति किलोमीटर सर्व्हिस रेटमध्ये वाढ केली जावी. गिग वर्कर्सने मागणी केली आहे की, इंधनाचे दर वाढल्यानंतर कमीत कमी २० रुपये प्रति किलोमीटर सर्व्हिस रेट ठरवले जावेत. त्यांनी सरकारला गिग वर्कर्सचं मानधन वाढवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले आहे.