Mumbai-Goa Highway Toll Collection : सध्या देशभरात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेल मिळणं कठीण झालं आहे. काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावर इंधन तुटवडा झाल्यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांना अधिक पैसे खर्च करावे लागणार आहे.
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. क्रॉक्रिटीकरणाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. शुक्रवारपासून खारपाडा टोलनाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टोल नाक्यावर कार चालकांना एकेरी प्रवासासाठी ९५ रुपये तर परतीच्या प्रवासासाठी १४५ रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ मेपासून टोलवसुली सुरू केली आहे. जो रस्ता पूर्ण झालेला नाही तेथे टोलवसुली कशासाठी असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. टोलवसुलीविरोधात उद्धवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसुली करण्यात येणार आहे.
खारपाडा टो नाक्यावरील दर (रुपयांमध्ये)
कार/जीप/व्हॅन - ९५ एकेरी प्रवास, १४५ परतीचा प्रवास, ३१५० मासिक पास
हलकी व्यावसायिक वाहने/मिनी बस - १५५ एकेरी प्रवास, २३५ परतीचा प्रवास, ५१९० मासिक पास
बस/ट्रक (दोन अॅक्सल) - ३२५ एकेरी प्रवास, ४९० परतीचा प्रवास, १०,८५० मासिक पास
तीन अॅक्सल व्यावसायिक वाहन - ३५५ एकेरी प्रवास, ५३५ परतीचा प्रवास, ११८७५ मासिक पास
जड बांधकाम यंत्रसामग्री/बहुअॅक्सल वाहन - ५१० एकेरी प्रवास, ७६५ परतीचा प्रवास, १७०२५ मासिक पास
सात किंवा अधिक अॅक्सल वाहन - ६१० एकेरी वाहन, ९१५ परतीचा प्रवास, २०३७५ मासिक पास
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world