UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं

UP News: उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील फफूंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात एका तरुणीने घर सोडण्यापूर्वी रचलेला बनाव पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. ही तरुणी रात्रीतून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली.

जाहिरात
Read Time: 2 mins

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि एखाद्या थ्रिलर चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी असा काही बनाव रचला की, संपूर्ण गाव दहशतीत आले होते. तिने आपल्या मागे सापाची कात सोडून स्वतः 'नागीण' बनल्याची अफवा पसरवली.

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील फफूंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावात एका तरुणीने घर सोडण्यापूर्वी रचलेला बनाव पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. ही तरुणी रात्रीतून आपल्या प्रियकरासोबत पळून गेली, मात्र जाताना तिने आपल्या अंथरुणावर सापाची कात, बांगड्या आणि सिंदूर ठेवला. सकाळी जेव्हा कुटुंबीयांनी हे पाहिले, तेव्हा त्यांची मुलगी माणूस नसून नागीण बनली आणि मानवी रूप सोडून निघून गेली, अशी अफवा संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.

काय आहे संपूर्ण घटना?

सकाळी मुलगी बराच वेळ खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना बेडवर 5 फूट लांब सापाची कात कपड्यांमध्ये गुंडाळलेली आढळली. जवळच बांगड्या आणि सिंदूर सांडलेला होता. ही बातमी पसरताच गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही महिलांनी पूजापाठ सुरू केला, तर काही लोक भीतीने त्या घराकडे जाण्यासही घाबरू लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना पाचारण केले.

(नक्की वाचा-  Pune News: पुणेकरांना रस्त्याने ये-जा करत 50 हजार रुपये कमाईची संधी! काय करावं लागेल?)

'नागीण' नाही, तर प्रेमाचा अँगल

फफूंद पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा या प्रकरणातील 'फिल्मी' सत्य समोर आले. पोलिसांना खोलीत कोणत्याही संघर्षाच्या खुणा आढळल्या नाहीत. तपासात समोर आले की, तरुणीचे गावातीलच एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबाचा या लग्नाला विरोध असल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

अंधश्रद्धेचा फायदा

तरुणीने जाणीवपूर्वक सापाची कात मिळवून ती बेडवर ठेवली होती. तिला माहित होते की, ग्रामीण भागात अशा गोष्टींवर लवकर विश्वास ठेवला जातो. जेणेकरून लोकांनी तिच्या बेपत्ता होण्याला 'रहस्यमयी' वळण द्यावे आणि तिचा शोध घेऊ नये.

(नक्की वाचा-  Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या! 'चिकनपॉक्स'च्या साथीने नागरिक चिंतेत, रुग्णांमध्ये मोठी वाढ)

पोलिसांनीसांगितले की, "हा सर्व प्रकार तरुणीने रचलेला एक बनाव होता. ती नागीण बनल्याची चर्चा पूर्णपणे निराधार आहे. आम्ही तरुणीचा मोबाईल सर्व्हिलन्सवर लावला असून लवकरच तिचा शोध घेतला जाईल." सध्या पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तरुणी आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article