जाहिरात

Pune News: पुणेकरांना रस्त्याने ये-जा करत 50 हजार रुपये कमाईची संधी! काय करावं लागेल?

Pune Traffic news: पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पकडलेल्या 600 वाहनचालकांच्या समुपदेशन सत्रात ही घोषणा केली.

Pune News: पुणेकरांना रस्त्याने ये-जा करत 50 हजार रुपये कमाईची संधी! काय करावं लागेल?

Pune Traffic Rule News: पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी एक अनोखी योजना आणली आहे. जे नागरिक 'पुणे ट्रॅफिक पोलीस' ॲपवर वर्षभरात सर्वाधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन नोंदवतील, त्यांना 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पकडलेल्या 600 वाहनचालकांच्या समुपदेशन सत्रात ही घोषणा केली.

कोणत्या नियमांच्या उल्लंघनाची तक्रार करता येईल?

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी स्पष्ट केले की, नागरिक आपल्या मोबाईलवरून खालील प्रकारच्या नियमांच्या उल्लंघनाचे फोटो किंवा व्हिडिओ ॲपवर अपलोड करू शकतात.

  • ट्रिपल सीट दुचाकी चालवणे.
  • फुटपाथवर वाहन उभे करणे (नो पार्किंग).
  • फॅन्सी नंबर प्लेट वापरणे.
  • रॅश ड्रायव्हिंग (बेदरकारपणे गाडी चालवणे).
  • गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे.
  • डबल पार्किंग करणे.

(नक्की वाचा-  Pune News: पुणेकरांनो काळजी घ्या! 'चिकनपॉक्स'च्या साथीने नागरिक चिंतेत, रुग्णांमध्ये मोठी वाढ)

'पीटीपी' (PTP) ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

हे ॲप सुरू झाल्यापासून पुणेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत 1.80 लाख वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पोलिसांनी या तक्रारींची पडताळणी करून 1.16 लाख वाहनचालकांविरुद्ध ऑनलाईन चलन जारी केले आहेत. प्रत्येक फोटो आणि व्हिडिओची पोलिसांच्या विशेष टीमद्वारे बारकाईने तपासणी केली जाते, जेणेकरून कोणावरही चुकीची कारवाई होऊ नये. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

सह पोलीस आयुक्त शर्मा यांनी वाहनचालकांना केवळ नियम पाळण्याचेच नाही, तर हेल्मेट वापरण्याचेही आवाहन केले. दर सोमवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात मद्यधुंद वाहनचालकांसाठी समुपदेशन सत्रे आयोजित केली जातात, जेणेकरून त्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत होईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com