VIDEO : घाणेरडी शेरेबाजी करणं तरुणाला महागात पडलं, विद्यार्थिनीने सळो की पळो केलं

तरुणाच्या शेरेबाजीनंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा सुरु केला. विद्यार्थिनीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर लोकांना या तरुणांना पकडले. त्यानंतर विद्यार्थिनीचा संताप अनावर झाला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विद्यार्थिनीवर आक्षेपार्ह शेरेबाजी करणे एका तरुणांना चांगलच महागात पडलं आहे. विद्यार्थिनीने रोडरोमियोची काठीने धुलाई केली आहे. तरुण माफी मागत होता मात्र विद्यार्थिनीने न थांबता राग व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मारहाणीनंतर तरुणाने पुन्हा असं न करण्याचा शब्द मुलीला दिला. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यातील शेखोपुरसराय परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा टवाळखोर तरुण रोज या रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थिनीवर घाणेरड्या कमेंट् पास करत होता. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या त्रासाने ही मुलगी देखील त्रासली होती. शुक्रवारी देखील या तरुणांना विद्यार्थिनीला पाहून शेरेबाजी केली. 

(नक्की वाचा-  35 सेकंदात खेळ खल्लास, वनराज निवांत उभा होता अन्...; पुण्यातील गँगवॉरचा Live Video)

मात्र तरुणाच्या शेरेबाजीनंतर विद्यार्थिनीने आरडाओरडा सुरु केला. विद्यार्थिनीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर लोकांना या तरुणांना पकडले. त्यानंतर विद्यार्थिनीचा संताप अनावर झाला. 

Advertisement

(नक्की वाचा - IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक विद्यार्थिनी काठीने एका तरुणाला चोप देताना दिसत आहे. तरुण वेदनेने मोठ-मोठ्याने ओरडतोय. स्वत:च्या बचावासाठी तरुण इकडे तिकडे पळतोय. मात्र आजूबाजूचे लोक देखील त्याल ढकलत आहेत. 

या घटनेनंतर तरुणाने आपली चूक मान्य केली. तसेच भविष्यात अशी कृती करणार नसल्याची शपथ देखील तरुणांना लोकांसमोर खाल्ली. ज्यानंतर लोकांना देखील तरुणाची सुटका केली.   

Advertisement

Topics mentioned in this article