गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे यांनी कुलगुरुपदाचा राजीनामा (Gokhale Institute vice chancellor Ajit Ranade) दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या कुलगुरुपदावरुन वाद सुरू होता. रानडे यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती रद्द करण्यात आली होती. मात्र कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळाला होता.
त्यानंतर अचानक अजित रानडे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे अजित रानडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे. अजित रानडे यांनी संस्थेला राजीनामा लिहीत तत्काळ पद सोडण्याचा निर्णय घेतला आला. गेल्या अनेक दिवसापासून अजित रानडे यांचं कुलगुरूपद वादात सापडलं होतं.
अध्यापनाच्या अनुभवाशी संबंधित पात्रता निकषांची पूर्तता केली नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर अजित रानडे यांना अडीच वर्षांनंतर हटवण्यात आलं होतं. विद्यापीठाचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी रानडे यांची कुलगुरुपदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द केली होती.
नक्की वाचा - गोखले संस्थेचे कुलपती बिबेक देबरॉय यांचा राजीनामा
2022 मध्ये अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र रानडे या पदासाठी पात्र नाहीत, विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य सरकारला चुकीची माहिती देण्यात आली, अनावश्यक पदांची निर्मिती करुन आर्थिक गैरव्यवस्थापन झाले अशा प्रकारच्या तक्रारी युजीसीकडे करण्यात आल्यानंतर कुलपती डॉ. राजीव कुमार यांनी डॉ. रानडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याहीवेळेस रानडे यांनी सर्व फेटाळले होते. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतरही रानडेंना पदावरुन हटवल्याच्या प्रकरणावर आक्षेप नोंदवला होता. सुनावणी होत नाही तोपर्यंत रानडेंना पदावरून हटवू नये असे आदेशही दिले होते. त्यानंतर १७ सप्टेंबरला कुलपदी बिबेक देबरॉय यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आता दोन ते तीन दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं.