- भारतीय रेलवे ने भीड़भाड़ वाले कई रूट्स पर वंदे भारत ट्रेनों में कोच की संख्या बढ़ाने का फैसला किया है.
- भारतीय रेलवे की ओर से अब कई 16 कोच वाली वंदे भारत में डिब्बों की संख्या को बढ़ाकर 20 कर दिया जाएगा.
- वहीं कुछ 8 कोच वाली वंदे भारत ट्रेनों में डिब्बों की संख्या को दोगुना कर 16 कर दिया जाएगा.
Vande Bharat Express : भारतीय रेल्वेकडून वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पर्यटकांचा प्रवास आरामदायी आणि सुविधापूर्ण बनविण्यासाठी भारतीय रेल्वेने गर्दीच्या मार्गावर चालणाऱ्या वंदे भारत ट्रेनमध्ये कोचची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वे मंत्रालयाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, सरकारने हाय डिमांडच्या मार्गावर चालणाऱ्या अनेक वंदे भारत ट्रेनमध्ये कोच वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय रेल्वेने 16 कोच/डबे असणाऱ्या वंदे भारतची कोच संख्या वाढवून 20 केली आहे. तर काही 8 डबे असणाऱ्या वंदे भारतला अतिरिक्त आठ डबे जोडण्यात येणार आहे.
आतापर्यंत 16 डबे असणाऱ्या वंदे भारत ट्रेनमधील डब्ब्यांची 20 वर
वंदे भारत ट्रेनमधील डब्यांची संख्या वाढवून 20 पर्यंत केली, त्यात...
- मंगळुरू सेंट्रल ते तिरुवनंतपुरम सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस (20631/32)
- सिकंदराबाद ते तिरुपति वंदे भारत एक्सप्रेस (20701/20702)
- चेन्नई एषुंबूर ते तिरुनेलवेलि वंदे भारत एक्सप्रेस (20665/20666)
वंदे भारत ट्रेनमधील 8 डब्यांची संख्या वाढून 16 करण्यात येणार, त्यात...
- मुदेर ते बंगळुरू कँट वंदे भारत एक्सप्रेस (20671/20672)
- वाराणसी ते देवघर वंदे भारत एक्सप्रेस (22499/20500)
- इंदूर ते नागपुर वंदे भारत एक्सप्रेस (20911/20912)
- हावड़ा ते राउरकेला वंदे भारत एक्सप्रेस (20871/20872)
नक्की वाचा - September Holiday : सप्टेंबरमध्ये शाळा आणि बँका किती दिवस बंद राहणार, ही पाहा संपूर्ण यादी
एक्सप्रेसचे डबे वाढल्याने प्रवाशांना होईल फायदा
- सरकारच्या या निर्णयामुळे जागांच्या संख्येत वाढ होईल आणि प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणं सोपं जाईल.
- ऑगस्टच्या सुरुवातीला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तरात सांगितलं की, भारतात सद्यस्थितीत १४४ ऑपरेशनल वंदे भारत ट्रेन आहेत.
- वंदे भारत सेमी हाय-स्पीड ट्रेन आहेत. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायी प्रवास करता यावा यासाठी डिझाईन आणि विकसित करण्यात आल्या आहेत.
- या गाड्यांमध्ये जलद एक्सीलरेशन, कवच सिस्टीम, पूर्णपणे सीलबंद गँगवे, स्वयंचलित दरवाजे आणि आरामदायी आसने अशी वैशिष्ट्ये आहेत. ट्रेनमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये गरम केस असलेली मिनी पेंट्री, बॉटल कूलर, डीप फ्रीजर आणि गरम पाण्याचे बॉयलर यांचा समावेश आहे.
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)