जाहिरात

1 लिटर पेट्रोल विकून भारत सरकार किती कमावतं? तेल कंपनी, पंप चालक यांना किती कमिशन मिळतं?

गाडीची टाकी फुल्ल करताना अनेकदा आपण विचार करतो की, इतक्या महागड्या इंधनाचा खरा फायदा कुणाला होतो? 

1 लिटर पेट्रोल विकून भारत सरकार किती कमावतं? तेल कंपनी, पंप चालक यांना किती कमिशन मिळतं?

Government of India earn from 1 liter petrol : पेट्रोल-डिझेलच्या किमती वधारताच सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम होतो. गाडीची टाकी फुल्ल करताना अनेकदा आपण विचार करतो की, इतक्या महागड्या इंधनाचा खरा फायदा कुणाला होतो? 

तुम्हाला माहीत आहे की, किरकोळ बाजारात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक लिटर पेट्रोलच्या किमतीपैकी जवळपास अर्धी रक्कम केवळ सरकारी करांमध्येच जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातून कच्चे तेल खरेदी करण्यापासून ते तुमच्या वाहनाच्या टाकीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत, केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि पेट्रोल पंप चालक मिळून प्रचंड नफा कमावतात.


कराच्या माध्यमातून केंद्राला किती नफा मिळतो?

कच्च्या तेलातील सर्वात मोठा भाग केंद्र सरकारकडे जातं. जेव्हा तुम्ही एक लिटर पेट्रोल खरेदी करता तेव्हा केंद्र सरकार केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज ड्यूटीच्या रुपात तब्बल १९.९० रुपये थेट वसुल करतात. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या तरीही कर प्रति लिटर एक निश्चित दराने आकारला जातो. देशभरात पेट्रोलची प्रचंड विक्री होत असल्यामुळे या निश्चित केलेल्या  करातून केंद्र सरकारला दररोज अब्जावधी रुपयांचा महसूल मिळतो. तोराष्ट्रीय महसुलाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.


राज्यांना किती नफा मिळतो? 

केंद्र सरकारशिवाय राज्यांतील सरकारांनाही पेट्रोलच्या विक्रीतून मोठा फायदा होतो. प्रत्येक राज्य सरकार आपल्या स्तरावर पेट्रोलवर मूल्यवर्धित कर म्हणजे वॅट वसूल करतात. हा टॅक्स विविध राज्यांच्या नीतींनुसार ठरवला जातो. जो प्रतिलीटर तब्बल १५ रुपयांपासून १६ रुपयांपर्यंत असतो. हे मुख्य कारण आहे की, देशातील विविध शहर आणि राज्यांमध्ये पेट्रोलच्या किरकोळ किमती एकसमान नसतात. काही राज्यांमध्ये वॅटची किंमत खूप जास्त असल्यामुळे पेट्रोलच्या किमती वधारतात. 

नक्की वाचा - LPG Price Hike : LPG नंतर PNG च्या किमतीही वाढणार? स्वयंपाकाच्या गॅसबाबत सरकारचा प्लान काय आहे?  


पंप मालकांची कमाई...

या संपूर्ण व्यवस्थेत जी व्यक्ती थेट जनतेला पेट्रोल विकते ते म्हणजे पेट्रोल पंप चालक. त्यांनाही इंधन कंपन्या एक ठराविक कमिशन देते. एक लिटर पेट्रोलच्या विक्रीवर पेट्रोल पंप डिलर यांना साधारण ३ रुपये ते ४.४५ रुपयांपर्यंत कमिशन मिळतं. डिझेलबद्दल सांगायचं झालं तर प्रति लिटर तब्बल १.८५ रुपयांपासून ३ रुपयांपर्यंत कमिशन ठरवलं जातं. या कमिशनची रक्कम देशातील मोठ्या सरकारी तेल विपणन कंपन्या उदा. इंडियन ऑइल किंवा भारत पेट्रोलियम मिळून ठरवतात. 


विक्रीवर व्यवसाय अवलंबून...

पेट्रोल पंप मालकांचं हे कमिशन मुख्यत्वे निश्चित दर आणि टक्क्यांचं एक मिश्रम आहे. याचा थेट अर्थ एक डिलरची एकूण कमाई पूर्णपणे पंपातून दररोज किती लिटर इंधनाची विक्री होते यावर अवलंबून असते. उदा. मुख्य हायवेवरील पेट्रोल पंपावर गाड्यांची मोठी ये-जा असते. त्यामुळे इंधन विक्रीचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे शहरातील रुंद गल्ल्यांमध्ये कमी विक्री होणाऱ्या पंपांच्या तुलनेत हायवे डिलर्सची दररोजची कमाई खूप जास्त असते. 


इतर माध्यमातूनही कमाई...

इंधन विक्री व्यतिरिक्त पेट्रोल पंप चालकांजवळ कमाईचे अन्य पर्यायही असतात. पंप डिलर आपलं उत्पन्न वाढविण्यासाठी गाड्यांमध्ये वापरले जाणारे ल्युब्रिकेंट आणि इंजन ऑइलची विक्री करतात. ज्यावर त्यांना १५ टक्के ते ४० टक्क्यांपर्यंत फायदा होता. यासोबत सध्या अधिकांश मोठ्या पेट्रोल पंपावर वाहनं धुणे म्हणजेच कार वॉशिंगची सुविधा आणि लहान-मोठे सुविधा देणारी दुकानंही असतात. याव्यतिरिक्त व्यावसायिक सेवांच्या माध्यमातूनही डिलर दर महिन्याला इंधन विक्रीशिवाय एक मोठा फायदा सहज कमावतात. 


इंधन कंपन्यांचा फायदा...

बहुतांश लोक विचार करतात की, इंधन मार्केटिंग कंपन्यांना प्रति लिटरनुसार किरकोळ कमिशन मिळतं. मात्र असं अजिबात नाही. या तेल कंपन्यांची खरी कमाई आंतरराष्ट्रीय बाजारातून खरेदी केलेल्या कच्च्या तेलाची मूळ किंमत आणि ते रिफायनरीमध्ये शुद्ध करून बाजारात विकल्या जाणाऱ्या किमतीतील फरकावर अवलंबून असतं. जेव्हा कंपन्या कच्चं तेल पेट्रोलमध्ये रुपांतरित करतात, त्यावेळी रिफाइनिंगचा संपूर्ण खर्च वेगळा करून जे शिल्लक राहतं ते कंपन्यांचा नफा असतो. अशा प्रकारे तुम्ही दिलेली पैसे विभागले जातात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com