- गलगोटिया यूनिवर्सिटी में दो छात्राओं के बीच निजी विवाद के कारण हाथापाई हुई और झगड़ा हिंसक रूप ले लिया
- झगड़े के दौरान छात्राएं एक-दूसरे के बाल खींचती और थप्पड़ मारती नजर आईं, जबकि अन्य छात्र केवल वीडियो बनाते रहे
- यूनिवर्सिटी परिसर में सुरक्षा व्यवस्था पर सवाल उठे, किसी छात्र या स्टाफ ने झगड़ा रोकने की कोशिश नहीं की
ग्रेटर नोएडा येथील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गलगोटिया युनिव्हर्सिटीमध्ये दोन विद्यार्थिनींमध्ये वैयक्तिक वादातून भर रस्त्यात हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, युनिव्हर्सिटी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भांडण करणाऱ्या दोन्ही विद्यार्थिनी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. मात्र, एका वैयक्तिक कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही विद्यार्थिनींनी एकमेकींचे केस ओढले, थोबाडीत मारल्या आणि एकमेकींवर लाथाबुक्क्यांनी प्रहार केला.
धक्कादायक बाब म्हणजे, तिथे उपस्थित असलेले शेकडो विद्यार्थी हे भांडण सोडवण्याऐवजी आरडाओरडा करत मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करत होते.
सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे
युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये ही घटना घडत असताना तिथे ना कोणी सुरक्षा रक्षक दिसला ना कोणी स्टाफ मेंबर. पालकांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. जर या हाणामारीत एखाद्या विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली असती, तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
(नक्की वाचा- VIDEO: पनवेलच्या कामोठ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! मेडिकलमध्ये घुसून 'मनसे'ने उतरवला तरुणाचा माज)
तक्रार आल्यास कारवाई करू- पोलीस
याबाबत पोलिसांनी सांगितले की, "व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला आहे, मात्र अद्याप युनिव्हर्सिटी किंवा विद्यार्थिनींकडून कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल." दुसरीकडे, गलगोटिया युनिव्हर्सिटी प्रशासनाने अद्याप यावर कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.