जाहिरात

VIDEO: पनवेलच्या कामोठ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! मेडिकलमध्ये घुसून 'मनसे'ने उतरवला तरुणाचा माज

Panvel News: पनवेलच्या कामोठे येथे 'जय भवानी मेडिकल स्टोअर'मध्ये तज्ज्ञ फार्मासिस्ट ऐवजी चक्क विद्यार्थी औषधे विकताना आढळल्याने मनसे आक्रमक झाली आहे.

VIDEO: पनवेलच्या कामोठ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! मेडिकलमध्ये घुसून 'मनसे'ने उतरवला तरुणाचा माज

Panvel News: औषधं देताना झालेली एक छोटीशी चूक कोणाच्या तरी जीवावर बेतू शकते. मात्र याचे भान न राखता कामोठे येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 'जय भवानी मेडिकल स्टोअर'मध्ये तज्ज्ञ फार्मासिस्ट ऐवजी चक्क विद्यार्थी औषधे विकताना आढळल्याने मनसे आक्रमक झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

नियमानुसार प्रत्येक मेडिकल स्टोअरमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट (Registered Pharmacist) असणे अनिवार्य आहे. मात्र, मनसेच्या धडक मोहिमेत असे दिसून आले की, मेडिकलमध्ये कोणताही अधिकृत परवाना नसताना विद्यार्थी रुग्णांना आणि ज्येष्ठ नागरिकांना औषधे देत होता.  

कसा उघड झाला प्रकार? 

एक ग्राहक जय भवानी मेडिकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेला होता. तिथे क्षुल्लक कारणावरून तेथील मुलाशी या ग्राहकाचं भांडण झालं. त्यानंतर मेडिकलमधील मुलाने अर्वाच्च भाषेत ग्राहकासोबत वाद घातला आणि काय करायचं ते कर अशी धमकी देखील दिली. याशिवाय मराठी भाषेत बोलण्यास देखील या मुलाने नकार दिला. हा सगळा वाद घालताना मुलाच्या चेहऱ्यावर माज स्पष्ट दिसत आहे. ग्राहकाच्या यानंतर मनसेची मदत घेतली.

VIDEO

(नक्की वाचा-  Ashok Kharat: 'भोंदू बाबा'वर मेहेरबान कोण? यादीत नाव नाही, तरीही खरातच्या मंदिराला निधी मंजूर! रेकॉर्डच गायब)

"एखाद्याचा बळी गेल्यावरच जागी होणार का?"

मनसे शहरअध्यक्ष मनोज कोठारी यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "चुकीचे औषध दिल्यामुळे जर एखाद्याचा जीव गेला, तर त्याला जबाबदार कोण? प्रशासन आता कोणाची वाट पाहत आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मनसेचा 'खळ्ळ-खट्याक' इशारा

मनोज कोठारी यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर तातडीने 'जय भवानी मेडिकल'वर कठोर कायदेशीर कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या खास शैलीत म्हणजेच 'खळ्ळ-खट्याक' उत्तर देईल. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com