गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. अहमदाबादहून लंडनला निघालेले हे विमान टेकऑफनंतर अवघ्या 10 मिनिटामध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानातून 242 लोक प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर घटनास्थळी हाहाकार उडाला असून बचावपथकाला सुरुवात झाली आहे. या विमानामध्ये नेमके कोणते प्रवासी होते? याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एअर इंडियाचे विमान एआय 171 हे लंडनला जात होते. विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. विमानाचा कॅप्टन सुमित सभरवाल होते, त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीमध्ये 8200 तासांचा अनुभव असलेले आहेत. एटीसीनुसार, विमानाने अहमदाबादहून 1.39 वाजता भारतीय वेळेनुसार धावपट्टी २३ वरून उड्डाण केले.
एटीसीने केलेल्या कॉलला विमानाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे 23 वरून निघाल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या परिघाबाहेर जमिनीवर कोसळले.