दिल्लीतील हवेची गुणवत्ती दिवसेंदिवस ढासळत आहे. दिल्लीतील प्रदूषण दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालला आहे. गुरुग्राममधील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) अत्यंत खराब श्रेणीमध्ये आहे. यामुळे शहरातील एका गृहनिर्माण संकुलाने वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एक अनोखी पद्धत निवडली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुरुग्राम सेक्टर 82 मधील DLF प्राइमस सोसायटीने धूळ आणि कणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन कार्यात मदत वापरण्यात येणारी स्प्रिंकलर आणि पाण्याच्या पाईप्सचा वापर करून 'कृत्रिम पाऊस' पाडला आहे. 32 मजली उंच असलेल्या टॉवर्समधून कॉम्प्लेक्सवर पाणी पाडलं जात असल्याची व्हिडीओ समोर आला आहे.
(नक्की वाचा- 'झोमॅटो बॉय' किती पैसे कमावतात?, Viral Video पाहून इमोशनल व्हाल)
#WATCH | Haryana: "Artificial rain" conducted using sprinklers from high rise building in DLF Primus Society, Sector 82 Gurugram to control air pollution. pic.twitter.com/ptWlqwVask
— ANI (@ANI) November 7, 2024
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष अचल यादव यांनी म्हटलं की, रहिवाशांचे आरोग्यासाठी हे उपाय केले गेले आहे. प्रदूषण केवळ सरकारद्वारे नियंत्रित केले जाऊ शकत नाही. सर्वांनीच हवेची गुणवसत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक असल्यास दररोज इथे कृत्रिम पाऊस पाडला जाणार आहे.
केवळ सरकारवर अबलंबून न राहता गुरुग्रामच्या प्रत्येक रहिवाशाचे यात योगदान दिली पाहिजे. आम्ही आमच्या 32 मजली इमारतींमधून कृत्रिम पाऊस पाडत आहोत. जेणेकरून किमान धूळ आणि इतर कण, जे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे नुकसान पोहोचवू शकतात, यातून दिलास मिळेल, असं यादव यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- भिंतीमधून पडत होतं AC चं पाणी, चरणामृत समजून पिण्यासाठी झाली गर्दी, प्रसिद्ध मंदिरातील Video Viral)
प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगचा प्रयत्न केला जाऊ शकतो. यामध्ये पर्जन्य वाढवण्यासाठी सिल्व्हर आयोडाइड आणि कोरड्या बर्फासारखे पदार्थ वातावरणात पसरवून केले जातात. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी या आठवड्यात सांगितले की, आप सरकार वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी कृत्रिम पावसाचा वापर करण्याचाही विचार करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world