जाहिरात

'झोमॅटो बॉय' किती पैसे कमावतात?, Viral Video पाहून इमोशनल व्हाल

Zomato Boy Viral Video : रितीकच्या व्हिडीओला 62 लाख लोकांनी पाहिलं आहे. तर सव्वा लाखांहून अधिक लोकांना या व्हिडीओला लाईक केलं आहे. यूजर्सनी रितीकच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. अनेकांना कमेंट्स करुन रितीकला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'झोमॅटो बॉय' किती पैसे कमावतात?, Viral Video पाहून इमोशनल व्हाल
Zomato Boy

डिजिटल युगात ऑनलाईन वस्तू मागवणे ही सामान्य बाब झाली आहे. मात्र आपल्या घरी वस्तू पोहोचवणारे डिलिव्हरी बॉय नेमके किती पैसे कमावतात, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने (Zomato Delivery Boy) मिनी व्लॉग (Mini Vlog) बनवत सहा तासात त्याने किती पैसे कमावले याची माहिती दिली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झोमॅटोमध्ये पार्ट टाईम काम कराणाऱ्या रितीक तोमरेने इन्स्टाग्रामवर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी 5 ते 11 वाजेपर्तंत केलेल्या कामाचा व्हिडीओ शेअर केला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये असलेल्या रितीकला त्या दिवशी एकूण 8 ऑर्डर मिळाल्या. या सर्वांचा त्याने एक व्लॉग बनवला. या सर्वामध्ये सहा तासात त्याने 316 रुपये कमावले, असं व्हिडीओतून दिसत आहे. 

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  भिंतीमधून पडत होतं AC चं पाणी, चरणामृत समजून पिण्यासाठी झाली गर्दी, प्रसिद्ध मंदिरातील Video Viral)

रितीकला पहिली ऑर्डर 40.60 रुपयांची मिळाली. त्यानंतर 20.70 रुपायांची, 50.80 रुपयांची, 33.90 रुपयांची, 24.60 रुपयांची, 70.20 रुपयांची, 42.5 रुपयांची आणि शेवटची ऑर्डर रात्री 11 वाजता 32.80 रुपयांची मिळाली. म्हणजेच एकूण सहा तासात रितीकने 316 रुपये कमावले. 

रितीकच्या व्हिडीओला 62 लाख लोकांनी पाहिलं आहे. तर सव्वा लाखांहून अधिक लोकांना या व्हिडीओला लाईक केलं आहे. यूजर्सनी रितीकच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. अनेकांना कमेंट्स करुन रितीकला शुभेच्छा दिल्या आहेत. 

(नक्की वाचा-  VIDEO : दारुच्या नशेत लावली नको ती पैज, जिंकलाही पण नंतर घडलं भलतंच...)

एका यूजरने म्हटलं की, "यश तुमची वाट बघत आहे, सर." दुसऱ्या एका यूजरने लिहिलं की, "म्हणून मी नेहमी त्यांना त्यांच्या वैयक्तिक QR वर टिप देण्याचे सुनिश्चित करतो. एक समाज म्हणून आपण किती सुन्न झालो, आहोत याचे मला वाईट वाटते. जर तुमच्याकडे बाहेर खायला पैसे असतील तर काही टिपसाठीही ठेवा"

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com