न कधी आई होऊ शकणार, चालताही येणं अशक्य; नराधमाने प्रेयसीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त, प्रेमाची ही कोणती पद्धत?

या प्रकरणानंतर पुन्हा एकदा २०१२ च्या निर्भया प्रकरणाची आठवण झाली आहे. या भयानक घटनेचे एक एक पदर उघड होत आहेत, जे संतापजनक आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • त्रिपुरा की छात्रा को गुरुग्राम में उसके लिव इन पार्टनर ने बेरहमी से पीटा और उसके प्राइवेट पार्ट को जला दिया
  • आरोपी ने स्टील की बोतल, लोहे की रॉड और चाकू से छात्रा को गंभीर चोटें पहुंचाई और फोन भी छीन लिया था
  • पीड़िता की मां ने प्रधानमंत्री और गृह मंत्री से गुहार लगाई है कि दोषी को सख्त सजा दिलाई जाए
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

प्रेम इतकं वेदनादायी आणि लाज आणणारं असू शकतं? प्रसिद्ध शायर निदा फाजली यांनी म्हटलंय, होश वालों को ख़बर क्या बे-ख़ुदी क्या चीज़ है, इश्क़ कीजे फिर समझिए ज़िंदगी क्या चीज़ है... गुरूग्राममध्ये दोन प्रेम करणाऱ्यांनी आपलं नवं आयुष्य सुरू केलं होतं. ऑनलाइन डेटिंग अॅपच्या माध्यमातून सुरू झालेली मैत्री प्रेमात बदलली आणि या कहाणीचा अंत पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

त्रिपुराच्या मुलीसोबत तो लिव्ह-इनमध्ये राहत होता. मुलाने तिने बंधक बनवून मारहाण केली. याशिवाय तिचा प्रायव्हेट पार्टही जाळला. यापुढे मुलीला कधीच चालताही येणार नाही आणि ती कधीच आईही होऊ शकणार नाही. या पीडित मुलीच्या आईने न्यायासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांकडे मदतीची मागणी केली आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा २०१२ च्या निर्भया प्रकरणाची आठवण झाली आहे. या भयानक घटनेचे एक एक पदर उघड होत आहेत, जे संतापजनक आहेत.

नक्की वाचा - Egg डोनेशन महिलांसाठी किती धोकादायक? बदलापुरातील भयंकर प्रकरणानंतर नवा मुद्दा चर्चेत

सर्व मर्यादा ओलांडल्या....

गुरुग्राममधील या घटनेत त्रिपुरातील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे आणि एफआयआरमध्ये धक्कादायक हिंसाचाराचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी प्रियकराने स्टीलची बाटली शस्त्र म्हणून वापरली. तिला वारंवार लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्याने मुलीचं डोकं भिंतीवर आदळल्याचा आरोप आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही आणि त्याने पीडितेवर चाकूने अनेक जखमाही केल्या. त्यानंतर, सॅनिटायझरच्या मदतीने तिचे गुप्तांग जाळल्याचाही आरोप आहे. आरोपीने तिचा इतका छळ केला की ती बिचारी मुलगी कोणाचीही मदत मागू शकली नाही. त्याने मुलीचा फोनही लपवून ठेवला होता.

मृत्यूशी देतेय झुंज....

पीडितेच्या आईने सांगितलं की, मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी ते गुरूग्रामला आले होते. मात्र तिच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या आरोपीला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या आईने केंद्र सरकारकडे केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो दिल्लीच्या नरेला भागात राहतो. त्याचं नाव शिवम असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीला आपल्या पार्टनरवर संशय होता. पीडित विद्यार्थिनी गुरुग्रामच्या बीएससी बॉयोटेकच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. यादरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची शिवमसोबत मैत्री झाली. तरुणाने तिला आपल्या घरी बोलावलं आणि तिला बंदी बनवून ठेवले गेले. तिचा छळ करण्यात आला.

Advertisement

Topics mentioned in this article