जाहिरात

Badlapur Egg Donation : Egg डोनेशन महिलांसाठी किती धोकादायक? बदलापुरातील भयंकर प्रकरणानंतर नवा मुद्दा चर्चेत

Egg डोनेशनच्या प्रोसेसमध्ये Egg डोनेशन करणाऱ्या महिलेला एका हार्मोनल ट्रीटमेंट घ्यावी लागतो.

Badlapur Egg Donation : Egg डोनेशन महिलांसाठी किती धोकादायक? बदलापुरातील भयंकर प्रकरणानंतर नवा मुद्दा चर्चेत

Badlapur Egg Donation : बदलापूरमध्ये महिलांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांचे स्त्री बीज काढून विकणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या धक्कादायक प्रकरणात आतापर्यंत 40 पीडित महिलांची माहिती समोर आली असून हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणानंतर Egg डोनेशनचा मुद्दा चर्चेत आला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

Egg डोनेशन काय असतं?

या प्रक्रियेत महिला आपलं Egg रुग्णालय किंवा आयव्हीफ सेंटरमध्ये डोनेट करू शकते. गर्भधारणेत अडचणी येणाऱ्या महिलांना हे स्त्री बीज साठवून ठेवणं फायदेशीर ठरतं.

  • ही एक असिस्टेड रिप्रोडक्शन प्रक्रिया आहे.
  • यामध्ये एक फर्टाइल महिला आपलं स्त्री बीज डोनेट करते
  • यामुळे इन्फर्टाइल महिलांना आई होण्यास मदत मिळते.
  • स्त्रीबीज लॅबमध्ये स्पर्मसह फर्टिलाइज केलं जातं.
  • ज्यानंतर आईच्या युट्रसमध्ये हे इम्प्लांट केलं जातं.
  • ज्यामुळे आईच्या युट्रसमध्ये भ्रूण तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते.

Egg डोनेशन प्रक्रिया महिलांसाठी धोकादायक असते का?

Egg डोनेशनमुळे महिलांच्या जीवाला धोका असतो. Egg डोनेशनच्या प्रोसेसमध्ये Egg डोनेशन करणाऱ्या महिलेला एका हार्मोनल ट्रीटमेंट घ्यावी लागतो. ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन Egg डोनेशनबाबत कायदे बनविण्यात आले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार Egg डोनेशनमध्ये तब्बल ८ टक्के महिलांचा मृत्यू होता. अशात ही प्रक्रिया अत्यंत सावधानतेने करावी लागते आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच ही प्रक्रिया करणं आवश्यक असतं. ज्या महिला गरजेपेक्षा जास्त वेळा Egg डोनेशन करतात, त्यांच्यासाठी धोका अधिक वाढतो.

Egg डोनेशनचे दुष्परिणाम काय असू शकतात?

स्त्रीबीज घेणाऱ्या महिलांना धोका...

  • गर्भपात
  • प्रीमॅच्युअर डिलिव्हरी
  • HIV
  • उच्च रक्तदाब
  • मधुमेह
  • जुळी मुलं होण्याची शक्यता

Egg डोनर महिलेलाही धोका...

  • वजन वाढणं
  • मूड स्विंग होणं
  • ब्लीडिंग
  • भविष्यात गर्भधारणेचा धोका

Egg डोनेशन कधीही करता येऊ शकतं का?

कोणत्याही महिलेच्या ओव्हरीमधून एका महिन्यात एक रिलीज होतं. रिलिज होणाऱ्या अंड्यांची संख्या वाढण्यासाठी महिलांना हार्मोनल इंजेक्शन दिलं जातं. यानंतर इंजेक्शनच्या माध्यमातून शरीरातून अंड बाहेर काढलं जातं आणि ते फ्रीज केलं जातं. Egg डोनेशन किंवा फ्रीजिंगनंतर आयव्हीएफच्या माध्यमातून कन्सिव केलं जाऊ शकतं.

कोणत्या परिस्थितीत Egg डोनरची मदत घेतली जाते?

३५ वयानंतर अधिकांश महिलांना यशस्वी गर्भावस्थेसाठी स्वस्थ अंडे तयार होत नाहीत. यामुळे Egg डोनरची मदत घेतली जाते.

जर कोणी महिलेला ३० ते ३५ वयात मेनॉपॉज (मासिक पाळी थांबणे) आलं, मात्र दाम्पत्याला मूल हवं असेल तर डोनरची मदत घेतली जाते.

कोणत्याही महिलेची मेडिकल ट्रीटमेंटमुळे ओव्हरी डॅमेज झाली असेल किंवा जन्मापासून ओव्हरी तयार झाली नसेल तर कुटुंब वाढविण्यासाठी एग डोनरची मदत घेतली जाते.

मूल होण्यात अडचणी येत असेल तरीही एज डोनर महिलेची मदत घेतली जाते.

एग डोनर होण्याचे नियम आणि अटी...

  • डोनर महिलेचं वय २१ ते ३५ दरम्यान असावं.
  • अल्पवयीन मुली एग डोनेट करू शकत नाही.
  • डोनर महिलेची मासिक पाळी नियमित असावी
  • महिलेला कोणत्याही प्रकारचे आजार नको
  • डोनर शारिरीक आणि भावनात्मकदृष्ट्या मजबूत असावी
  • बॉडी मास इंडेक्स (BMI) २८ पेक्षा कमी असावा
  • अमली पदार्थाचे सेवन करू नये, धूम्रपान करणारी नसावी
  • डोनर जास्तीत जास्त सहा वेळा एग डोनेट करू शकते
  • डोनेशनमध्ये तीन ते चार महिन्यांचं अंतर असावं.

एज फ्रीज कोण करू शकतं?

एग फ्रीज करणं याला वैद्यकीय भाषेत Mature Oocyte Cryopreservation म्हटलं जातं. महिलांची प्रजनन क्षमता संरक्षित करण्याची प्रक्रिया म्हणजे एग फ्रीज करणं. भविष्यात कुटुंब वाढविण्याची इच्छा झाल्यानंतर एग फ्रीजिंगचा वापर केला जातो. एग फ्रीजिंगमध्ये महिलांच्या शरीरात अंडाशयातून परिपक्व अंडे बाहेर काढले जाते आणि नायट्रोजनच्या बरोबरीच्या तापमानात फ्रीजमध्ये ठेवलं जातं. ज्या महिला जास्त वयात आई होऊ इच्छितात त्यांसाठी एग फ्रीजिंग फायदेशीर ठरतं, दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com