Viral Hospital Bill:रुग्णाची हॉस्पिटलकडे एक मागणी अन् 1 लाखाचे बिल 57 हजारांवर, सगळ्यांना जागृत करणारी पोस्ट

एका रुग्णाने रुग्णालयाचे 1 लाख रुपयांचे बिल 'आयटमाइज्ड बिल' (तपशीलवार बिल) मागून 57000 रुपयांवर आणले. रुग्णालयाने न केलेल्या शस्त्रक्रियेचे आणि भूलतज्ज्ञांचे शुल्क आकारल्याचे तपासात उघड झाले.

Also Read in
जाहिरात
Read Time: 2 mins

Viral Post: वैद्यकीय उपचारांनंतर रुग्णालयाकडून येणारे बिल डोळे झाकून भरणाऱ्यांसाठी ही बातमी डोळे उघडणारी आहे. एका रुग्णाने जानेवारी महिन्यात एका रुग्णालयात उपचार घेतले होते. सुरुवातीला विमा (Insurance) वजा जाता या रुग्णाला 1 लाख रुपयांचे बिल देण्यात आले. मात्र, केवळ एका सल्ल्यामुळे या रुग्णाने 'आयटमाइज्ड बिल' (Itemised Bill) मागितले आणि धक्कादायक वास्तव समोर आले.

अशा पकडल्या हॉस्पिटलच्या चुका

रुग्णाने जेव्हा सहा पानांचे तपशीलवार बिल तपासले, तेव्हा त्यात अनेक विसंगती आढळल्या. रुग्णाला 'ॲनेस्थेसिया कन्सल्टेशन'साठी (भूलतज्ज्ञ सल्ला) 31,430 रुपयांचा चार्ज लावला होता, जो प्रत्यक्षात कधी झालाच नव्हता. उपचारांसाठी लागणाऱ्या एका 'सप्लाय किट'चे पैसे दोनदा आकारण्यात आले होते. जेव्हा ही बाब बिलिंग विभागाच्या निदर्शनास आणून दिली, तेव्हा अवघ्या दोन आठवड्यांत हे शुल्क काढून टाकण्यात आले आणि बिल 1 लाखावरून थेट 57000 रुपयांवर आले.

Advertisement

    व्हायरल पोस्ट

    asked for an itemized hospital bill on a whim and found out they charged me for stuff that literally never happened
    by u/LongjumpingOffice432 in povertyfinance

    (नक्की वाचा- Dhurandhar 2: 'धुरंधर 2' ने उडवला धुरळा! 'बडे साहब'वरूनही पडदा उठला, अंडरवर्ल्ड डॉनला पाहून थक्क व्हाल!)

    सोशल मीडियावर संताप

    ही घटना व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. अनेक युजर्सच्या मते, रुग्णालये मुद्दाम अशा चुका करतात कारण त्यांना माहित असते की लोक तपशील तपासणार नाहीत. "विमा कंपन्या प्रीमियम वाढवण्यासाठी भांडतात, पण रुग्णालये जेव्हा तुमची फसवणूक करतात तेव्हा ते गप्प का बसतात?" असा सवाल एका युजरने उपस्थित केला. सरकारी देखरेखीच्या अभावामुळे रुग्णालये निर्ढावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

    बिल भरण्यापूर्वी 'हे' नक्की करा

    • फक्त एकूण रकमेची 'समरी' न घेता, प्रत्येक गोळी आणि प्रत्येक सुईचा हिशोब असलेले 'आयटमाइज्ड बिल' मागा.
    • डॉक्टरांनी सांगितलेले उपचार आणि बिलात लावलेले चार्जेस याची तुलना करा.
    • बिलात एखादी गोष्ट समजली नाही, तर त्वरित बिलिंग विभागाला विचारणा करा.
    • आयटमाइज्ड बिल मागितल्यामुळे अनेकदा बिलात 15 ते 20 टक्क्यांची कपात होते. कारण अनेक अनावश्यक चार्जेस हॉस्पिटलकडून स्वतःहून काढून टाकले जातात.