घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहून व्हिडीओ काढणे एका दाम्पत्याला चांगलंच महागात पडलं. या व्हिडीओमुळे दाम्पत्याला तुरुंगात जावं लागलं आहे. उर्मिला कुमारी आणि सागर गुरुंग असं अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.
उर्मिला कुमारी अनेकदा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असते. नुकताच आपल्या घराच्या बाल्कनीत उगवलेल्या झाडांचा व्हिडिओ त्यांना बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या फॉलोअर्सना माहिती देताना उर्मिलाने सांगितले होते की तिने बाल्कनीमध्ये एकूण 17 फ्लॉवर पॉट्स लावले आहेत, त्यात दोन कुंड्यांमध्ये गांजा लावला आहे.
(नक्की वाचा- Viral Video : छठ पूजेदरम्यान पाण्यात अचानक आला साप, महिलेने काय केलं पाहा?)
'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कुंड्यांमध्ये गांजा लावल्याची बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी उर्मिला कुमारी आणि तिचा पती सागर गुरुंग यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला आणि सागर गुरुंग हे सिक्कीमचे रहिवासी असून एमएसआर नगरमध्ये राहतात. घरात गांजाचे रोप असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ते तातडीने तेथे पोहोचले. पोलीस घरी पोहोचेपर्यंत त्यांनी झाडे उपटून डस्टबिनमध्ये टाकली होती.
(नक्की वाचा- गोमांस खाऊ घातलं, मुस्लीम नाव दिलं, Mrs. India Galaxy 2024 रिनीमा बोरानं सांगितला 'लव्ह जिहाद'चा अनुभव)
पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी घरात गांजाचे रोप नसल्याचे सांगितले. पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली असता त्यांना काही पाने सापडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही त्याचा फोन तपासला तेव्हा 18 ऑक्टोबर रोजी व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्याची पुष्टी झाली. ज्यामध्ये गांजाचे रोप होते.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना दाम्पत्याचा मोबाईल जप्त केला आहे. चौकशीत या जोडप्याने झटपट पैसे कमवण्यासाठी गांजा पिकवल्याची कबुली दिली आहे. मंगळवारी दोघांनाही अटक करण्यात आली आहे. दोघांचीही जामीनावर सुटका देखील झाली आहे.