हैद्राबादचं एक दाम्पत्य जवळपास तीन आठवड्यांपूर्वी स्वित्झर्लंडला फिरायला गेले होते. येथेच दोघंही बेपत्ता झाल्याची माहिती आहे. ५१ वर्षी पब्बा चंद्रशेखर व्यावसायिक आहे आणि त्याची ४२ वर्षीय पत्नी स्वप्ना एक हाऊस मेकर आहे. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची मुलगी श्रेया पब्बा हिने चेरलापल्ली पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
स्वित्झर्लंडला फिरायला गेले होते अन् झाले बेपत्ता...
त्यांची मुलगी पनीने तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या आई-वडिलांनी २ जून रोजी ते स्वित्झर्लंडला जाणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर ते घरातून निघून गेले. सुरुवातीला ते कुटुंबाच्या संपर्कात होते. मात्र ८ जुलैनंतर नातेवाईकांसोबत त्याचं बोलणं बंद झालं. वारंवार प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दोघांचे मोबाइल फोन बंद होते किंवा कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होते. बराच काळ आई-वडिलांशी संपर्क न झाल्याने २३ वर्षीय सॉफ्टवेयर प्रोफेशनल मुलगी श्रेयाने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
गुंतवणूकदारांवर ५० कोटी रुपयांचा अपहार केल्याचा संशय
पोलिसांकडून आता पती-पत्नीची ट्रॅव्हल आयटनरी, इमिग्रेशन रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहाराचा तपास करीत आहे. जेणेकडून मुलीच्या दाव्यानुसार, तिचे आई-वडील स्वित्झर्लंडला गेले होते की नाही याबाबत माहिती मिळेल. चंद्रशेखर आणि त्यांच्या पत्नीने गेल्या काही वर्षात ६० पेक्षा जास्त जणांहून तब्बल ५० कोटी रुपये जमा केले होते. ज्यामध्ये रिटर्न देण्याचं आकर्षण दाखविण्यात आलं होतं.
आर्थिक व्यवहार आणि प्रवास रेकॉर्डचा तपास...
दाम्पत्य गायब होण्यामागे आर्थिक अपहार तर नाही ना याचा शोध घेतला जात आहे. अद्याप तरी पोलिसांनी अपहाराचा कोणताही आरोप केलेला नाही. सध्या तरी या दाम्पत्याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये आपल्या इच्छेने बेपत्ता होणं आणि आर्थिक फसवणूक या पैलूने तपास केले जात आहे. दरम्यान या घटनेमुळे कुटुंब चिंतेत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world